Two arrested for stealing expensive cameras in Nashik
Two arrested for stealing expensive cameras in Nashik  
उत्तर महाराष्ट्र

महागडे कॅमेरे चोरणाऱ्या दोघांना अटक; डेहराडून पोलिसांनी घेतले ताब्यात 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : लग्नसमारंभाच्या फोटोची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने पवईतील (मुंबई) फोटोग्राफरला नाशिकमध्ये बोलावून, वकीलवाडीतील हॉटेलमध्ये त्यास थंडपेयातून गुंगींचे औषध पाजले आणि त्याच्याकडील लाखो रुपयांचे कॅमेरे चोरून पोबारा करणाऱ्या दोघांना सरकारवाडा पोलिसांनी डेहराडून येथून ताब्यात घेतले. उमरखान खान आणि अब्दुला मुस्तकीन (दोघे रा. उत्तरप्रदेश) अशी या दोघा संशयितांची नावे असून जस्ट डायलवरून फोटोग्राफरांची मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना अशारितीने गंडा घालण्यात ते सराईत झाले होते. दोघांना न्यायालयाने येत्या 5 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

निर्मल यशपाल सिंह (रा. पवई) यास गेल्या 15 सप्टेंबर ला लग्नाच्या साखरपुड्याचे फोटो काढण्यासाठी दोघा संशयितांनी फोन करून नाशिकला बोलाविले आणि वकीलवाडीतील हॉटेल पंचवटीमध्ये त्यास थंडपेयातून गुंगींचे औषध पाजले होते. त्यानंतर दोघा संशयितांनी निर्मल सिंह यांचे 11 लाख रुपयांचे महागडे कॅमेरे, लेन्स चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल होता. संशयितांनी त्यांचा मोबाईल क्रमांक बदलला असल्याने त्यांचा माग काढणे पोलिसांनी कठीण झाले होते. परंतु पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजवरून दोघांचे छायाचित्र काढले आणि ते महाराष्ट्रासह दिल्ली पोलिसांना पाठविले होते. दरम्यान, डेहराडून पोलिसांनी या दोघांना अटक केल्याची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांचे एक पथक रवाना झाले आणि त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. संशयितांनी नाशिकसह डेहराडून व मसुरी येथेही अशारितीने फोटोग्राफर्सचे महागडे कॅमेरे चोरले होते. तर दिल्ली पोलिसांनी अमीर अली या संशयितालाही याच गुन्ह्यात अटक केली असून त्याच्याकडून 50 लाख रुपयांचे 10 महागडे कॅमेरेही जप्त केले आहेत. दोघा संशयितांना नाशिक पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांना येत्या 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

जस्ट डायलचा असाही वापर -
संशयितांनी जस्ट डायल या संकेतस्थळावरून शहरांमधील नामांकित वा महागडे कॅमेऱ्यांचा वापर करणाऱ्या फोटोग्राफर्सचे मोबाईल क्रमांक वा संपर्क क्रमांक मिळवित. त्यानंतर त्यांना लग्नसमारंभ, साखरपुड्यांच्या ऑर्डरचे आमिष दाखवून त्याच वा अन्य शहरांमध्ये बोलावून घेत आणि गुंगीचे औषध पाजून कॅमेरे चोरत होते. तर, संशयित उमर खान हा यापूर्वी भाडेतत्त्वाने इनोव्हा कार चालवायचा. ती कार चोरीला गेल्याने कारमालकाने त्याच्याकडून नुकसान भरपाई मागितली असता, त्यासाठी त्याने त्याचा महागडा कॅमेरा विकला होता. तेव्हापासूनच त्याने साथीदाराच्या मदतीने कॅमेरे चोरीचा फंडा शोधून काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT