उत्तर महाराष्ट्र

विभोरचा प्रवास बीएस्सी ते सराईत गुन्हेगार 

सकाळवृत्तसेवा

जळगाव - कुटुंबातील सुसंस्कारित व शैक्षणिक वातावरणात विभोर जाधव याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण केले. तालुक्‍याच्या ठिकाणी बीएस्सी पदवी परीक्षेत प्रथम क्षेणीत उत्तीर्ण झाला. पुण्याला प्रसिद्ध कंपनीत आणि चांगल्या पगारावर रुजू झाला. दरम्यान, याचवेळी एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडल्याने तिला पळवून नेल्याने पोक्‍सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात अटक झाली अन्‌ त्याचे आयुष्यच भरकटले. कारागृहात रवानगी झाली अन्‌ या ठिकाणी त्याने गुन्हेगारीचे धडे गिरविले. 

एरंडोल तालुक्‍यातील उच्चशिक्षित विभोरने विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्यानंतर तो पुण्यात प्रसिद्ध कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीस लागला. यादरम्यान गावातील मुलीला त्याने प्रेम प्रकरणातून पळविले. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला अन्‌ विभोर मुलीसह पोलिसांच्या हाती लागला. या खटल्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आली. विभोर ती भोगण्यासाठी कारागृहात आला. गुन्हा घडल्यानंतर अनेकजण कारागृहात येतात; पण नंतर ते सुधारून परततात. मात्र, विभोरबाबत उलटेच घडले. विभोरचे कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांत असलेले काही कैदी मित्र झाले. तेथून सुटल्यावर त्याने याच मित्रांच्या मदतीने पिंपळगाव हरेश्‍वर (ता. पाचोरा) येथे दरोडा टाकला. यानंतर त्याचा गुन्हेगारीचा प्रवास सुरू झाला. दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केल्यावर त्याची कारागृहात रवानगी झाली. या ठिकाणी त्याची मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील खुनाच्या घटनेत कारागृहात असलेल्या गौतम सोनवणेशी मैत्री जमली. बाहेर पडल्यावर दोघांनी मिळून मास्टर चावीच्या सहाय्याने शहरात ठिकठिकाणांहून दुचाकींची चोरी केल्याचे समोर आले. 5 फेब्रुवारीस न्यायालयात तारखेवर आलेल्या विभोर व गौतमने वकिलाची दुचाकी लांबविली होती. हा प्रकार येथील सीसीटीव्हीत कैद झाला होता. 

विभोरने साथीदार गौतम सोनवणेसह शहरातून चोरलेल्या सर्व दुचाकी हिरो होंडा शाईन कंपनीच्या आहेत. शाईन ही विभोरच्या सर्वांत आवडीची दुचाकी असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. विभोर पैशांसाठी नव्हे तर केवळ हौस म्हणून दुचाकी चोरी करतो. यानंतर कुठेतरी पार्किंगमध्ये लावून तो पसार होतो. त्याच्याकडून मिळालेल्या चारपैकी दोन दुचाकी त्याने बांभोरी महाविद्यालयाच्या बाहेरून चोरलेल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT