उत्तर महाराष्ट्र

पोलिसपाटलाच्या मुलावर विळ्याने वार

सकाळवृत्तसेवा

जळगाव - असोदा (ता. जळगाव) येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. यात पोलिसपाटलाच्या मुलाच्या डोक्‍यात विळ्याने वार करून जखमी करण्यात आले आहे. तर विरुद्ध गटाच्या तरुणाच्या दंडावर ब्लेडने वार करण्यात आले. दोन्ही गटाने एकमेकांवर दगडफेकही केली. यात दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. यात एक वर्षाचा मुलगाही जखमी झाला आहे.

असोदा येथील पोलिसपाटील आनंदा बिऱ्हाडे व त्यांची आतेबहीण सुनीता अनिल भालेराव दोघे नातेवाईक शेजारी शेजारी राहतात. सुनीता भालेराव यांचा मुलगा पवन हा मस्करी करीत पोलिसपाटीलच्या मुलाला बोलला. याचा राग आल्याने दोन्ही गटात वाद सुरू झाला. याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात लाठ्या काठ्यांचा वापर करून दगडफेक करण्यात आली. 

पवन सोनवणे याने पोलिसपाटीलचा मुलगा प्रेमराज बिऱ्हाडे याच्या डोक्‍यात विळा मारल्याचे सांगण्यात आले. तसेच पाटीलपाटीललाही धक्काबुक्की करून त्यांच्या पत्नीला दगड मारल्याने जखमी झाल्याचे श्री. बिऱ्हाडे यांनी सांगितले. तर विरुद्ध गटाचे सुनीता भालेराव यांनी सांगितले, की पोलिसपाटील गावात दादागिरीने वागतात. मस्करी केल्याने त्यांच्या मुलांनी व भावांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करून दगडफेक केली. 

अपंग मुलगी सुनीतालाही बेदम मारले. यात पवनच्या डाव्या हाताच्या दंडावर ब्लेडने वार केल्याचे दिसून आले. तसेच सुनीता भालेराव (वय ३५), पवन सोनवणे (वय ३०) आशाबाई सोनवणे (वय ३५), सचिन अरुण सोनवणे (वय २०) व पवन सोनवणे वय एकवर्ष यांना मारहाण केली. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांनी तक्रार न घेता हुसकावून लावल्याचे सुनीता भालेराव यांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT