नाशिक - पाणी कपातीमुळे जुने नाशिक परिसरातील रहिवाशांनी घराबाहेर लहान-मोठ्या भांड्यात केलेला पाण्याचा साठा.
नाशिक - पाणी कपातीमुळे जुने नाशिक परिसरातील रहिवाशांनी घराबाहेर लहान-मोठ्या भांड्यात केलेला पाण्याचा साठा. 
उत्तर महाराष्ट्र

पाणीबाणीमुळे नागरिकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - भविष्यातील पाण्याची चिंता डोळ्यासमोर ठेवून महापालिका प्रशासनाने रविवार (ता. ३०) पासून एकवेळ पाणीकपात केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्याने नाशिककरांचे हाल झाले.

एकीकडे पाऊस पडत असताना नळांच्या तोट्या मात्र कोरड्या राहिल्याने राखून ठेवलेल्या पाण्यावरच दिवस भागवावा लागला. शासकीय व खासगी कार्यालयांत ‘जार’च्या पाण्यावर तहान भागवावी लागली. ज्यांच्याकडे पाणी साठविण्याची व्यवस्था नाही अशा ठिकाणी पाणी दुसऱ्याकडून घेण्याची वेळ नागरिकांवर आली. विशेषतः जुन्या नाशिकसारख्या भागात पाणीकपातीचा परिणाम दिसला.

गंगापूर धरणातील पाणी कमी झाल्याने व धरण परिसरात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने रविवारपासून कपातीचा निर्णय घेतला. ज्या भागात दोन वेळा पाणी येते, तेथे एकवेळ कपात केल्याने दररोज ६० दशलक्ष लिटर पाणी वाचल्याचा दावा करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील पाणीकपातीनंतर दोन दिवसांत पाऊस न झाल्यास आठवड्यातून एक दिवस संपूर्ण दिवस पाणीकपातीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी गुरुवारचा दिवस निश्‍चित करण्यात आला.

कपातीने प्रभावित झालेले क्षेत्र
नाशिक रोड भागातील उपनगर कॅनॉल रोडवर सकाळपासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. शहरातील ग्रामीण भागातील विहीर व विंधनविहिरींवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करण्यात आला.

तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारीसाठी आलेल्या मजूर, कामगारांना सोसायट्या, नगरांमध्ये नागरिकांकडून पाणी मागावे लागले. जुने नाशिक भागात पाणी साठवणक्षमता नसल्याने शिल्लक पाण्यावरच दिवस काढावा लागला. सिडको भागातही जुन्या नाशिकप्रमाणेच परिस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT