Common Man
Common Man esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : कशाला हवे गुजरात, आम्ही येथे सुखी आहोत!; सीमावर्ती भागातील नागरिकांच्या भावना

विनोद सूर्यवंशी

नवापूर (जि. नंदुरबार) : सांगली, कोल्हापुरातील कर्नाटक सीमेवरील काही गावांतील लोकांनी विकास आणि नागरी सुविधांकडे महाराष्ट्र सरकारने आमची दखल न घेतल्याने आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या, असे सांगत नवा प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्याला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली फोडणी यामुळे सीमेवरील गावातील लोकांचा प्रश्‍न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यातच नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील गावांनीही आम्हाला गुजरातला जोडा, अशी मागणी केल्याने गुजरात सीमेवरील गावांचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

नवापूर तालुक्यातील गुजरातच्या सीमेवरील गावांचा फेरफटका मारला असता, येथे मात्र वेगळे वातावरण दिसले. आमच्या भागात पुरेसा विकास होत असून, राज्य शासन सर्वतोपरी सुविधा देत असून, कशाला हवंय गुजरात, आम्ही येथे सुखी आहोत, अशा आशयाच्या प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी दिल्या आहेत. (Why need Gujarat we happy here Sentiments of citizens in border areas Latest Nandurbar News)

सीमावर्ती भागातील काही गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची तक्रार आहे. नवापूर तालुक्यातील काही गावे गुजरातच्या सीमेनजीक आहेत. गुजरात राज्याचे आकर्षण आहे. काही लोकं रोजगारासाठी गुजरात राज्यात दर वर्षी जातात. मात्र आपलं गाव गुजरात राज्यात समाविष्ट करायचे, हा विचार येथील नागरिकांच्या मनालाही शिवत नाही, असे त्यांच्याशी बोलण्यातून पुढे आले. या सीमावर्ती गावांना मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे आपलं गाव गुजरात राज्यात समाविष्ट करावे, अशी मागणी आजपर्यंत झालेली नाही.

नवापूर तालुक्याची काही गावे गुजरात राज्याच्या सीमेलगत आहेत. नवापूर शहरापासून गुजरातचे उच्छल तालुक्याचे ठिकाण तीन किलोमीटरवर आहे. सोनगड हे २५ किलोमीटरवर असले तरी गुजरातची सीमा नवापूरपासून सात-आठ किलोमीटरपासून सुरू होते. सोनगडनजीक लक्कडकोट हे गाव आहे. बेडकी, खेकडा, कारेघाट, झामणझर ही गावे सोनगड बाजूला आहेत. आहवा (डांग) या बाजूला रायपूर, प्रतापपूर, बोकळझर, उकाळापाणी ही गावे आहेत. बाजूला आमलाण, करंजवेल, करोड अशी गावे आहेत.

ही गुजरात सीमावर्ती आदिवासी बहुल गावे आहेत. या गावांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या गावातील गावकऱ्यांनी कधीही गुजरात राज्यात समाविष्ट होण्याची मागणी केली नाही. आजही नाही. उलट नवापूरला लागून असलेली गुजरात राज्यातील गावांतील नागरिक हे नवापूर तालुक्यात व शहरात बाजारपेठसाठी ये-जा करतात. इतर सर्वच व्यवहार हा नवापूर शहराशी संबंधित राहिला आहे.

संयुक्त महाराष्ट्र व गुजरात राज्याचे विभाजन झाले त्या वेळी नवापूर शहरात बहुतांश गुजराथी समाज होता, तरी नवापूर शहर महाराष्ट्रात राहावे, यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. नवापूर शहर महाराष्ट्रात राहिल्यानंतर येथील लोकप्रतिनिधींनी शहरासह तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहिले. माजी मंत्री सुरूपसिंग नाईक व माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित या दोन्ही नेत्यांचा तालुक्याच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. तालुक्यातील कानाकोपऱ्यांतील गावांपर्यंत बारमाही रस्ते तयार केले. वीज, पाणी, सिंचनाची सुविधा याकडे लक्ष दिले.

First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

राज्य सरकार किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था विकासकामाकडे लक्ष देऊन असतात. पेसा कायद्यांतर्गत ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मुबलक निधी उपलब्ध होतो. त्यामुळे मूलभूत सुविधा स्थानिक गरजांनुसार पुरविल्या जातात. इथल्या आदिवासी बांधवांसाठी बारमाही रस्ते, गाव-पांड्यांवर गल्लोगल्ली सिमेंट काँक्रिटचे रस्ते आहेत. गावठाण फिडर स्वतंत्र आहे. शेतीसाठी वीज, पाणी, मोबाईल कनेक्टिव्हिटी, शाळा, आरोग्य या सगळ्याच बाबी उपलब्ध आहेत.

गुजरातची मुले शिक्षणास नवापुरात

गुजरात राज्यातील उच्छल, सोनगड, व्यारा येथील विद्यार्थी नवापूर शहरात उच्च माध्यमिक शिक्षणासाठी येत असत. उच्छल तालुक्यातील बहुतांश नागरिक उपचारासाठी नवापूर येथील शासकीय रुग्णालयात येत असत. तालुक्यात आरोग्य केंद्र, नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपप्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. मोबाईल कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी आहे. गावपाड्यांवर प्राथमिक शिक्षणासह शासकीय व खासगी अनुदानित आश्रमशाळा, माध्यमिक विद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

"कारेघाट गुजरात राज्याच्या सीमेलगत असले तरी महाराष्ट्र शासनाने बहुतांश मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आम्ही महाराष्ट्र राज्यात आनंदी आहोत, त्यामुळे गुजरात राज्यात समावेश करण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही" -अरविंद गावित, पोलिसपाटील, कारेघाट

"आमच्या लक्कडकोट गावात व आजूबाजूला असलेल्या नवापूर तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमावर्ती गावांना रस्ते, पाणी, प्राथमिक शिक्षण आरोग्य मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. दळणवळण व्यवस्था बारमाही असल्याने गुजरातला जा की महाराष्ट्रात, सर्व आलबेल असल्याने गुजरात राज्यात जाण्याचा विचार येत नाही."

-जागृती शंकर गावित, अध्यक्ष, समृद्धी महिला मंडळ लक्कडकोट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT