Mobile Network Tower
Mobile Network Tower esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 38 नवीन मोबाईल टॉवरच्या कामांना वेग

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी (ता. २१) सकाळी झाली. तीत केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत तीन लाभार्थ्यांच्या वारसांना प्रातिनिधीक स्वरुपात दोन लाखांचा धनादेश प्रदान झाला.( Work on 38 new mobile towers speeded up jalgaon news)

खासदार डॉ. सुभाष भामरे अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, अशासकीय सदस्य तथा माजी सभापती अरविंद जाधव व विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदनाचा योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना देण्यात यावा. जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आरोग्य विभागाने शिबीर घ्यावे.

नियमित लसीकरण कार्यक्रमांतंर्गत गरोदर माता व बालकांचे शंभर टक्के लसीकरण करावे. आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षांनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करावे. प्रधानमंत्री उज्जवला योजनेच्या लाभापासूच वंचित असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. सुकन्या समृद्धी योजनेची माहिती जनसामान्यापर्यंत पोहचण्यासाठी प्रचार, प्रसिद्धी करावी.

दिल्ली- धुळे- मुंबई कॉरिडॉरच्या माध्यमातून फुड प्रोसेसिंग, टॅक्सटाईल्स मिल तसेच इतर क्षेत्रात नवयुवकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत या क्षेत्रासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच साक्रीत २५, शिरपूर २, धुळे ३, शिंदखेडा येथे ८, अशा एकूण ३८ नवीन मोबाईल टॉवरच्या कामांना वेग दिला जावा, अशी सूचना खासदारांनी दिली.

बैठकीत प्रधानमंत्री फसल विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन योजना, बेटी बचाव- बेटी पढाओ योजना, एकात्मिक बाल विकास योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री उज्जवला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधेंशी संबंधीत दूरसंचार, रेल्वे, महामार्ग, प्रधानमंत्री खनीज क्षेत्र कल्याण योजना, प्रधानमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आदी विषयांवर चर्चा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT