chalisgaon
chalisgaon 
उत्तर महाराष्ट्र

बेपत्ता रवींद्रचा केला खून; 37 दिवसांनी मिळाला मृतदेह

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जातो, असे घरी सांगून गेलेल्या कृष्णापुरी तांडा (ता. चाळीसगाव) येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या मदतीने आज सकाळी नऊच्या सुमारास पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गावातील तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे, कृष्णापुरी तांडा येथील रवींद्र रामसिंग चव्हाण (वय 22) हा तरुण 11 जूनला घरी त्याच्या वडिलांना "मी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाऊन येतो' असे सांगून रात्री साडेआठला निघाला. मात्र, घरी परतलाच नाही. त्याच्या घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता, तो कुठेही मिळून न आल्याने वडील रामसिंग चव्हाण यांनी 13 जूनला मुलगा हरविल्याची नोंद मेहुणबारे पोलिस ठाण्यात केली. 

37 दिवसांपासून होता बेपत्ता 
रवींद्र चव्हाण हा बेपत्ता होऊन आज 37 दिवस झाले होते. याबाबत परिसरात विविध चर्चा सुरू होत्या. रवींद्रचे वडील रामसिंग चव्हाण यांना त्यांच्या शालकाने सांगितले, की कृष्णापुरी तांडा येथील एका मुलीशी रवींद्र फोनवर बोलत होता. त्यावेळी त्या मुलीचा भाऊ राहुल जाधव याने रवींद्रला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. ही माहिती रामसिंग चव्हाण यांनी पोलिसांना सांगितली. 

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे त्या दृष्टीने तपासण्यास सुरवात केली. तपास अधिकारी शालिग्राम कुंभार व कमलेश राजपूत यांनी तपासाला गती दिली. सुरवातीला बेपत्ता रवींद्रचा मोबाईल कर्नाटकात सापडला. त्यानंतर या प्रकरणात मुंबईच्या तरुणीची देखील पोलिसांनी चौकशी केली होती. यात त्यांना राहुल किसन जाधव (वय 21), हिम्मत ऊर्फ अजय रामसिंग जाधव (22) व सचिन पुंडलिक जाधव (21) या तिघांवर संशय बळावला. तिघांच्या शेताच्या परिसरात शोधकार्य सुरू केले. यातील सचिन जाधव याच्या कृष्णापुरी धरणाच्या सांडव्याच्या खालच्या बाजूला बेपत्ता रवींद्रच्या नातेवाइकांना सोबत घेऊन आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शोध घेतला असता, नाल्याजवळील दाट इंग्रजी बाभुळाच्या झाडीत मातीचा ढिगारा पोलिसांना दिसला. त्याच्या बाजूला एक चप्पलही आढळली. त्याच क्षणी पोलिसांनी ढिगाऱ्यावरील माती काढली असता, दुर्गंधी येण्यास सुरवात झाली. या ठिकाणी बेपत्ता रवींद्रचा मृतदेह 11 जूनच्या रात्रीच पुरल्याचा संशय बळावला. त्यानंतर घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ, उपनिरीक्षक नजिम शेख, हेमंत शिंदे, सुभाष पाटील आदींनी धाव घेऊन जागेची पाहणी केली. तहसीलदार कैलास देवरे यांना कळविल्यानंतर नायब तहसीलदार नानासाहेब आगळे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर आले. मृत रवींद्रचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढून मृतदेह विच्छेदनासाठी धुळे येथे पाठविला. या प्रकरणी रामसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुल जाधव, हिंमत ऊर्फ अजय जाधव, सचिन जाधव या तिघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

कृष्णापुरी येथील बेपत्ता रवींद्रच्या प्रकरणात तेथील मुलीच्या भावाने गुन्हा कबूल केला आहे. यात अजून काही आरोपी वाढण्याची शक्‍यता आहे. 
- दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT