Principal Amrit Patil and fellow teachers accepting the sound system at the hands of Gulal Narsai Patil.
Principal Amrit Patil and fellow teachers accepting the sound system at the hands of Gulal Narsai Patil. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar ZP News : जि.प. शाळा आदर्श बनविण्यासाठी आदर्श शिक्षक दांपत्याची धडपड; ग्रामस्थांची लाभतेय मोलाची साथ

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar ZP News : वर्षानुवर्षे दुर्लक्षित झालेली शाळेची इमारत, भकास पडलेला शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांची रोडावलेली उपस्थिती आणि घसरलेली शैक्षणिक गुणवत्ता या समस्यांतून शाळेला बाहेर काढून यापूर्वी अनेक शाळांना आदर्श बनविणारे राज्य आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक अमृत पाटील यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.(ZP school teacher couple struggle to make school ideal nandurbar news)

या वर्षी जूनमध्ये परिवर्धा (ता. शहादा) येथील जिल्हा परिषद शाळेत पदभार घेतला असला, तरी काही महिन्यांतच शाळेचा कायापालट करीत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी व ग्रामस्थांना लोकसहभागाचे महत्त्व पटवून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

जिल्हा परिषद परिवर्धे शाळेत गेल्या जूनपासून राज्य पुरस्कारप्राप्त दांपत्य अमृत पाटील व उज्ज्वला पाटील नवीनच बदलीने रुजू झाले असून, हे दांपत्य शाळेत रुजू झाल्यापासून शाळेचा चेहरामोहरा बदलला असून, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विद्यार्थी उपस्थिती व विविध उपक्रमांचा वर्षाव होऊ लागला आहे.

अल्पावधीत शिक्षकांनी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, सरपंच सपना शेवाळे व परिवर्धा ग्रामस्थांच्या मदतीने शाळेला लोकसहभागातून सर्व भौतिक सुविधा परिपूर्ण करून घेतल्या आहेत. आजअखेर शाळेला रोख व वस्तू स्वरूपात एक लाख ५२ हजार ७५० रुपये लोकसहभाग जमा झाला असून, अल्प कालावधीत एवढा लोकसहभाग जमा करणारी जिल्ह्यातील पहिली शाळा आहे.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, केंद्रप्रमुख अशोक देवरे, हरीश पाटील, ईश्वर पाटील, निराकार महाराज, मुख्याध्यापक अमृत पाटील, शिक्षकवृंद व बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक अमृत पाटील, उज्ज्वला पाटील, जयवंत जोशी यांनी प्रयत्न केले.

साउंड सिस्टिम भेट

परिवर्धा येथे जिल्हा परिषद केंद्रशाळेला गावातील ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते गुलाल नरसई पाटील यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ साउंड सिस्टिम भेट देऊन आदर्श निर्माण केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा लोकसहभागातून उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनानेसुद्धा शिक्षकांचे कौतुक केले आहे.

''आम्ही पती-पत्नी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालो आहोत. त्यामुळे आमची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. यापूर्वीची शाळा आदर्श केली. आता जेथे जाऊ तेथे ती शाळाही आदर्श करण्याचा मानस आहे.''-अमृत पाटील, मुख्याध्यापक, परिवर्धा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT