esakal | Nandurbar Zp: जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस-शिवसेनेची सत्ता कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Congress-Shiv Sena

Nandurbar Zp: जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस-शिवसेनेची सत्ता कायम

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार ः जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) ११ गटांसाठी झालेल्या पोटनिवडणूकीत (Election) आज मतमोजणीनंतर (Counting of votes) जाहीर झालेला निकालात कॉंग्रेस-शिवसेनेला (Congress-Shiv Sena) प्रत्येकी तीन जागा व भाजपला चार तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक जागा मिळाली आहे. या निवडणुकीत भाजपला तीन जागा गमवाव्या लागल्या आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेची प्रत्येकी एक-एक जागा वाढल्या आहेत.

हेही वाचा: Jalgaon:पातोंडा येथील जवान गणेश सोनवणे जम्मू काश्मीर येथे शहिद


ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील ११ गटांचा सदस्यांचे पद रद्द झाले होते. त्यात नंदुरबार तालुक्यातील पाच, शहादा तालुक्यातील ४ तर अक्कलकुवा तालुक्यातील दोन गटांचा समावेश होता. एकूण अकरा जागांमध्ये भाजपचे सात, शिवसेनेचे दोन व काँग्रेसचे दोन जागांचे नुकसान झाले होते. मात्र पोटनिवडणुकीत आजचा निकालात भाजपला आपल्या सात जागा कायम ठेवण्यात अपयश आले आहे. त्यांच्या तीन जागा घटले असून शिवसेना ,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी एक जागा जास्तीची ताब्यात घेतले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही सदस्य रद्द झाले नव्हते, मात्र तरी त्यांनी निवडणुकीत भाग घेतल्याने त्यांना एक जागा अधिकची मिळाली आहे.

जि प गटातील पक्ष निहाय विजयी उमेदवार व मिळालेली मते अशी ः

१) कोळदा गट : सुप्रिया विजयकुमार गावित (६७०७) _भाजप
२) खोंडामळी गट : शांताराम साहेबराव पाटील - भाजप (७०७७)
३). लोणखेडा गट : जयश्री दीपक पाटील - भाजप (७३५७)
४) कहाटूळ गट : ऐश्वर्या जयपालसिंह राऊळ - भाजप (५८२०)
५) कोपरली गट : राम चंद्रकांत रघुवंशी -शिवसेना (८६६८)
६) रनाळा गट : शकुंतला सुरेश शिंत्रे- शिवसेना (७०९७)
७) मांडळ गट : जागृती सचिन मोरे - शिवसेना (६२९९)
८)खापर गट : गीता चांदया पाडवी- काँग्रेस (६५९७)
९) अक्कलकुवा गट : सुरया बी अमीन मकरानी (३००६)
१०) म्हसावद गट : हेमलता अरुण शितोळे - काँग्रेस (५८०४)
११) पाडळदा गट : मोहन सिंग पवन सिंग शेवाळे- राष्ट्रवादी काँग्रेस- (४८०३)

हेही वाचा: गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची लेक धरती देवरेंचा दणदणीत विजय


प स.गण ,पक्षनिहाय विजयी उमेदवार व मिळालेली मते कंसात अशी ः

१) गुजरभवाली गणः शितल धमेर्ंद्रसिंग परदेशी -शिवसेना (३३९५ )
२) पातोंडा गणः दीपमाला अविनाश भिल -शिवसेना ( ३४००)
३)नांदर्खे गण ः प्रल्हाद चैनसिंग राठोड - शिवसेना (३५२८ )
४) गुजरजांभोली गण ः तेजमल रमेश पवार -शिवसेना ( २३४०)
५)होळतर्फे हवेली ः सीमा जगन्नाथ मराठे -भाजप ( २६८८)
६) कोराई गण ः अश्विनी दिलीप वसावे -शिवसेना ( बिनविरोध )
७) सुलतानपूर गण ः वैशाली किशोर पाटील - कॉंग्रेस (२८५२)
८) खेडदिगर गण ः संगीता शांतीलाल पाटील - कॉंग्रेस (२३१२)
९)मंदाणे गण ः रोहिणी दिनेश पवार -कॉंग्रेस (२७८२)
१०) डोंगरगाव गण ः श्रीराम धनराज याईस -भाजप (३३४९)
११) मोहिदे तह गण ः कल्पना श्रीराम पाटील- भाजप (३२६६)
१२) जावदे तबो गण ः निमा औरसिंग पटले - कॉंग्रेस (२००९)
१३ )पाडळदे बु गण ः सुदाम मंगळू पाटील - राष्ट्रवादी (२९४८)
१४) शेल्टी गण ः किशोर पाटील, भाजप (२७३५),

हेही वाचा: Dhule ZP Election:धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता कायम..


११ गट पक्षीय बलाबल
भाजप - ४
काँग्रेस - ३
शिवसेना - ३
राष्ट्रवादी काँग्रेस - १

loading image
go to top