Nandurbar ZP News : जिल्हा परिषदेत 488 रिक्त पदभरती साठी जाहिरात लवकरच; या संकेतस्थळावर द्या भेट

Advertisement will be released soon to fill 488 vacant posts in various departments in ZP nandurbar news
Advertisement will be released soon to fill 488 vacant posts in various departments in ZP nandurbar newsesakal

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील पेसा क्षेत्र व नॉन पेसा क्षेत्राकरिता ४८८ रिक्त पदे भरण्याकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांनी दिली. (Advertisement will be released soon to fill 488 vacant posts in various departments in ZP nandurbar news)

राज्य शासनामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरावयाची आहेत. त्यात नंदुरबार जिल्हा परिषदेंतर्गत गट क संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (नॉन पेसा) आरोग्यसेवक (पुरुष/महिला) औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक/लेखा) पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, विस्ताराधिकारी (कृषी), विस्ताराधिकारी (शिक्षण), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पर्यवेक्षिका, कनिष्ठ अभियंता या पदांचा समावेश असेल.

अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) आरोग्यसेवक (पुरुष/महिला), कंत्राटी ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाचा पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला असून, या पदाची जाहिरात राज्यात एकाच वेळी प्रसिद्ध होणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Advertisement will be released soon to fill 488 vacant posts in various departments in ZP nandurbar news
Nandurbar Unseasonal Rain : पुन्हा घास हिरावला; अवकाळी पावसाने जयनगर परिसराला झोडपले...!

या पदभरतीकरिता शासनस्तरावरून दोन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ४८८ रिक्त पदे भरण्यासाठी आयबीपीएस कंपनीची निवड करण्यात आली असून, पदभरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.

विद्यार्थी, नागरिकांनी पदभरतीच्या जाहिरातीसाठी जिल्हा परिषदेच्या www.zpndbr.in या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी. कोणत्याही अफवांना अथवा गैरप्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे..

Advertisement will be released soon to fill 488 vacant posts in various departments in ZP nandurbar news
Parking Problem : टोइंग थांबल्याने चालकांच्या बेशिस्तीत वाढ! नवीन ठेकेदारासाठीची प्रक्रिया संथगतीने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com