मतदान
मतदान Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

युपीत शेवटच्या टप्प्यातील मतदान संपले, 5 वाजेपर्यंत 54.18 टक्के मतदान

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तर प्रदेशात 403 जागांसाठी सोमवारी (दि. 7) रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांमध्ये 54.18 टक्के मतदान झाले आहे. राज्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात 61.24 टक्के मतदान झाले होते. यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील मतदान पूर्ण झाले असून, मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. (UP Assembly Election 2022)

सातव्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी

उत्तर प्रदेश विधानसभा 2022 च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात पूर्वांचलमधील नऊ जिल्ह्यांतील 54 विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.18 टक्के मतदान झाले आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला असून, सायंकाळी 5 वाजेपर्यंत चंदौली जिल्ह्याने आघाडी कायम ठेवली होती, तर वाराणसीनेही 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला होता. पाच वाजेपर्यंत आझमगडमध्ये 52.34 टक्के, भदोही 54.26, चंदौली 59.59 टक्के, गाझीपूर 53.67, जौनपूर 53.55, मऊ 55.04, मिर्झापूर 54.93, सोनभद्र 56.95 आणि वाराणसीमध्ये 52.79 टक्के मतदान पार पडले आहे.

वाराणसीकडे सर्वांचे लक्ष

पंतप्रधान मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी आणि अखिलेश यादव यांचा लोकसभा मतदारसंघ आझमगडमध्ये आज मतदान झाले. या ठिकाणी 2017 मध्ये भाजपने 54 पैकी 36 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, 2017 मध्ये सपाने 11 जागा जिंकल्या होत्या. तर, मायावतींनीही 6 जागा जिंकल्या होत्या. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीमध्ये वाराणसीमध्ये पीएम मोदी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी आले होते. त्यामुळे या मतदारसंघात नेमका कोणता पक्ष विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT