file photo
file photo 
विदर्भ

निवडणुकीसाठी 12 हजार कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विधानसभा निवडणुकीत मतदानकेंद्रांवर केंद्राध्यक्ष म्हणून वर्ग (2) गट अ, ब तसेच मतदान अधिकारी म्हणून वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांना जबाबदारी सोपविली जाणार आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघांत ही संख्या 12 हजारांच्या घरात जाणार आहे.
जिल्ह्यात विधानसभानिहाय मतदानकेंद्र धामणगावरेल्वे 372, मेळघाट 353, दर्यापूर 337, बडनेरा 328, तिवसा 319, मोर्शी 310, अमरावती 309, अचलपूर 300, अशी एकूण 2628 आहेत. प्रत्येक मतदानकेंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष तसेच तीन मतदान अधिकारी राहणार आहेत. या हिशेबाने 10, 512 अधिकाऱ्यांची गरज भासणार आहे. शिवाय 20 टक्के अधिकारी, कर्मचारी राखीव राहतील. राखीव अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 2096 असेल. असे एकूण 12,608 अधिकारी, कर्मचारी निवडणुकीत सहभागी होतील, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
केंद्राध्यक्ष वर्ग (2) चे अधिकारी किंवा वर्ग (3) मधील परंतु उच्च श्रेणीतील असतील तर मतदान अधिकारी वर्ग (3) मधून नियुक्त केले जातील, अशी माहिती आहे. याशिवाय पोलिस, मदतनीस व स्थानिक कर्मचारी ही संख्या वेगळी राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT