विदर्भ

नागपुरात १२ वर्षांच्या मुलीवर वृद्धाचा बलात्कार 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - घराशेजारी राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर एका ६० वर्षांच्या वृद्धाने मॅगी खाऊ घालण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला. ही घृणास्पद घटना बुधवारी (ता. २०) शांतीनगरात उघडकीस आली. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वृद्धास अटक केली. शैलेंद्र हिरामन गजभिये (रा. शांतीनगर) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेंद्र गजभिये याचा टायर विक्रीचा मोठा व्यवसाय असून तीन माळ्यांच्या इमारतीत राहतो. एकुलत्या मुलीचे लग्न झाल्यानंतर पत्नीसह तो शांतीनगरात राहतो. वृद्ध विकृत वृत्तीचा असल्याचे बोलले जाते. त्याच्या घराशेजारी एक पतीपासून विभक्‍त झालेली महिला राहते. तिला दोन मुली असून ती एका हॉटेलमध्ये पोळ्या बनविण्याचे काम करते. तिची पीडित १२ वर्षीय लहान मुलगी स्मिता (बदललेले नाव) हिच्यावर शैलेंद्रचा डोळा होता. धार्मिक वृत्तीची पत्नी नेहमी बाहेर राहत असल्यामुळे शैलेंद्र घरात नेहमी एकाकी राहत होता. ऑक्‍टोबर २०१८ मध्ये घरासमोर खेळत असलेल्या स्मिताला मॅगी खाऊ घालण्याचे आमिष दाखवून घरी येण्यास सांगितले. मॅगी मिळणार या आशेने स्मिता वृद्धाच्या घरी गेली. त्याने तिला मॅगी दिल्यानंतर तिच्याशी अश्‍लील चाळे केले. तिने प्रतिकार केला असता आई आणि बहिणीचा चाकूने भोसकून खून करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलगी भेदरली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात वृद्धाने तिला घरी नेले आणि बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिला नेहमी घरी बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागला. 

असा उघडकीस आला प्रकार
मंगळवारी सायंकाळी सहा वाजता शैलेंद्रची पत्नी घरी नव्हती. त्यामुळे त्याने संधी साधून स्मिताला दमदाटी करीत ‘लगेच घरी ये’, असा दम दिला. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या दोन महिलांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. वृद्धाच्या मागेच स्मिता जायला लागली. त्या महिलांनी नुकत्याच घरी आलेल्या तिच्या आईला घटना सांगितली. आईने मुलीला आस्थेने विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT