File photo
File photo 
विदर्भ

14 वर्षीय मुलीवर युवकाचा बलात्कार

सकाळवृत्तसेवा

नागपूर : आईवडिलांचे छत्र हरविल्यामुळे मामाच्या घरी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला. मुलीच्या सख्ख्या मामीने त्या युवकाला बलात्कारासाठी प्रोत्साहित करीत स्वतःचे घर उपलब्ध करून दिले. नात्याला काळिमा फासणारी घटना अजनीत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दिलीप नारायण राठोड (वय 21, रा. जय गुरुदेवनगर, अजनी) आणि पूजा राकेश फ्रान्सीस (वय 25) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 14 वर्षीय मुलगी स्नेहा (बदललेले नाव) हिच्या बालपणातच आईवडिलांचे निधन झाले. त्यामुळे ती अजनीत राहणाऱ्या मामाकडे राहायला आली. मामा लग्न झाल्यापासून पत्नी पूजासह आईवडिलांपासून विभक्‍त राहतो. सध्या स्नेहा आजी-आजोबांकडे राहते. तिच्या वस्तीत आरोपी दिलीप राठोड राहतो. तो बेरोजगार असून त्याचे आईवडील भिलाई येथील एका कंपनीत मजूर म्हणून कामाला आहेत. त्यामुळे तो अजनीत एकटाच राहतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे पूजाच्या घरी येणे-जाणे वाढले. त्याची वाईट नजर स्नेहावर पडली. त्याने स्नेहाला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे दिलीपने तिची मामी पूजाची मदत घेतली. पूजाच्या मदतीने स्नेहाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर 19 फेब्रुवारी 2019 रोजी स्नेहा घरात असताना दिलीप घरी आला. त्याने स्नेहासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून 10 मार्चपर्यंत रोजच तिला दमदाटी करून तो शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता.
मामीच करायची मदत
आरोपी दिलीप आणि मुलीचा मामा रमेश यांची मैत्री होती. काही दिवसांतच दिलीपने रमेशची बायको पूजाशी मैत्री केली. स्नेहाशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत त्यांचा "सौदा' झाला. स्नेहा एकटी घरात असताना दिलीपला तिने घरात पाठवले आणि बाहेरून दरवाजा लावून घेतला. दिलीपने बळजबरी केल्याची तक्रार स्नेहाने मामीकडे केली. मात्र, स्नेहाला यापुढेही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मामीनेच दमदाटी केल्याचा आरोप आहे.
अशी आली घटना उघडकीस
दिलीपचा अत्याचार मामी पूजाच्या मदतीने सुरू होता. स्नेहा त्याच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळली होती. सोमवारी स्नेहाची मावशी तिला भेटायला आली. स्नेहाची स्थिती पाहता तिने आस्थेने चौकशी केली असता, लैंगिक शोषण झाल्याचे तिने मावशीला सांगितले. मावशीने थेट पोलिस स्टेशन गाठून तक्रार देत अत्याचाराला वाचा फोडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SCROLL FOR NEXT