corona positive.jpg
corona positive.jpg 
विदर्भ

चिंताजनक : मृत पॉझिटिव्ह रुग्णाच्या मुलीसोबत आता मुलगाही कोरोना बाधित!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : एकीकडे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे दुपार तपासणीचे रिपोर्ट निगेटिव्ह येत असताना दुसरीकडे मात्र पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबियांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्याची स्थिती आहे.

13 एप्रिल रोजी मृत्यू झालेल्या रुग्णाचा 15 एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मृत्यू झालेल्या त्याच्या कुटुंबातील सतरा वर्ष मुलीचा शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात पॉझिटिव्ह आला होता तर रविवारी पुन्हा त्याच कुटुंबातील 14 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता अकोल्यात तीन वर्ष बालकासह या सतरा वर्षीय मुलगी आणि 14 वर्षीय मुलाचा पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून समावेश झाला आहे.

रविवारी (ता.19) सकाळी  प्राप्त अहवालानुसार, 32 अहवाल आज प्राप्त झाले. त्यामध्ये एका जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 31 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण हा 14 वर्षीय मुलगा असून १३  एप्रिल रोजी मयत झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची मुलगा आहे. या दोन्ही रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यात तीन पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात एकूण 16 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.त्यापैकी एका जणाने आत्महत्या केली होती तर दुसऱ्याचा मृत्यू झाला होता. 

उर्वरित  रुग्णांपैकी अकरा जणांचे दुबार तपासणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. तर एका तीन वर्ष चिमुकल्याचा दुबार तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अशातच शनिवारी पुन्हा एका 17 वर्षीय मुलीचा प्राथमिक तपासणी  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि आज रविवारी पुन्हा त्याच कुटुंबातील मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. असे जरी असले तरी ज्या 11 रुग्णांचा दुबार तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे त्त्यांच्या कोरोना तपासणीचे अद्यापही काही अहवाल येणे असल्याने त्यांना कोरोना मुक्त समजणे चुकीचे ठरणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT