File photo
File photo 
विदर्भ

अमरावतीत मिसाईल निर्मितीची मुहूर्तमेढ

सकाळवृत्तसेवा

अमरावती : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या मिसाईल प्रकल्पाला अखेर चालना मिळाली आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे येत्या एका महिन्यातच या प्रकल्पाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.
रशियाच्या एका कंपनीसोबत या संदर्भात करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत येत्या एका महिन्यातच या प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे.
कमी अंतराच्या मिसाईलची (शॉट मिसाईल) निर्मिती या ठिकाणी होणार आहे. नांदगावपेठच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भारत डायनॉमिक्‍सतर्फे मिसाईल कारखाना सुरू होणार होता. मात्र, गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. या कारखान्यासाठी नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत जागासुद्धा निश्‍चित झाली आहे. त्या ठिकाणी कुंपण तसेच अन्य कामेसुद्धा करण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात कारखाना सुरू होत नव्हता. त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या संदर्भात पालकमंत्री पोटे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT