river
river 
विदर्भ

दोन मुलांचा नदीपात्रात बुडून मृत्यू 

अनिल दंदी

बाळापूर (अकोला) : शहरापासून जवळच असलेल्या मन  नदीच्या पात्रात दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाकरीता रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

परिसरातील नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेली ही  दोन मुले विटभट्ट्यावर कामासाठी असलेल्या मजुरांची मुले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास याच परिसरात असलेल्या मजुरांची काही मुले नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले होते. 
कुणाल कैलास काळे (वय 10), ऋतीक प्रमोद मोरे (वय 9, रा. धाडी ता. नांदुरा जिल्हा बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. मन नदीपात्रातील पाण्याचा अंदाज व पोहता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती परिसरात असलेल्या काही सुज्ञ नागरिकांना आणि पोलिसांना समजताच त्यांनी शोध मोहीम सुरू केली. प्रभारी ठाणेदार वैभव पाटील  या घटनेचा तपास करत असून, मुलांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना लगेच पाचारण केले. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचे मृतदेह आज त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT