file photo
file photo 
विदर्भ

भंडारा जिल्ह्यातील 29 प्रकल्प ओव्हरफ्लो

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या 63 प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा आहे. यातील 29 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.
जिल्ह्यातील लघू, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा मुबलक साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील 63 प्रकल्पात सरासरी 79.23 टक्‍के पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात 1.2 टक्‍क्‍यानी वाढ झालेली आहे.
लघुपाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यात तुमसर तालुक्‍यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्‍यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे. सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्‍केवारी 97.84 टक्के, बघेडा 75.63 टक्के, बेटेकर बोथली 43.83 टक्के आणि सोरणा जलाशयात उपयुक्त जलसाठा 20.92 टक्‍के आहे. जिल्ह्यात एकूण 31 लघू प्रकल्प आहेत. सध्यस्थितीत 31 लघू प्रकल्पात उपयुक्त जलसाठा 72.82 टक्‍के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा 90.50 टक्‍के आहे. जिल्ह्यातील एकूण 63 प्रकल्पात सध्यस्थितीत 96.45 दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे.
गतवर्षी 9 सप्टेंबर रोजी 63 प्रकल्पात 94.99 दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता. त्याची टक्‍केवारी 78.03 टक्के एवढी होती.
भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या 63 प्रकल्पांपैकी 29 प्रकल्प तुडुंब भरले आहेत. यात तुमसर तालुक्‍यातील कवलेवाडा, परसवाडा, डोंगरला, मोहाडी तालुक्‍यातील नागठाणा, भंडारा तालुक्‍यातील मंडनगाव, सिल्ली आंबाडी, पवनी तालुक्‍यातील वाही, भिवखिडकी, पिलांद्री, साकोली तालुक्‍यातील गुढरी, एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझरी, पिंडकेपार, पाथरी, परसोडी, लवारी, सितेपार, सानगडी, लाखनी तालुक्‍यातील मुरमाडी हमेशा, वाकल, रेंगेपार (कोहळी), लाखांदूर तालुक्‍यातील पिंपळगाव, चप्राड, इंदोरा, दिघोरी, दहेगाव व झिरी यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT