53 colleges get grant : Vinod Tawde
53 colleges get grant : Vinod Tawde 
विदर्भ

53 महविद्यालयांना मिळणार अनुदान : विनोद तावडे

शशांक लावरे

अकोला : राज्यात 24 नोव्हेंबर 2011 पूर्वीच्या 53 महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुदानावर आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात या महाविद्यायांची तपशिलवार माहिती संकलित करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील सर्व विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना पत्र पाठविले आहे. 

याबाबत विनोद तावडे यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी उच्च शिक्षण संचालक पुणे यांना सदर महाविद्यालयांची तपशिलवार माहिती संकलित करून 25 सप्टेंबर 2018 पूर्वी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याचा सविस्तर प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभाग सात दिवसांच्या आत वित्त विभागाकडे पाठविणार आहे. या संदर्भात पुढील बैठक 1 ऑक्टोबरला तावडे यांच्या दालनात आयोजित करण्यात अली आहे. याबाबतचे पत्र स्वतः विनोद तावडे यांनी अमरावती, नागपूर, औरंगाबद, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, जळगाव, मुंबई आणि पनवेल येथील विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना पाठविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT