Beby berth 
विदर्भ

Health : रखरखत्या उन्हात रस्त्याच्या कडेला आदिवासी महिलेची प्रसूती! परिसरातील महिला आल्या धावून

सकाळ डिजिटल टीम

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वाडेगावात स्थानिक स्टेट बँक समोर असलेल्या खाजगी दवाखान्यासमोर तळपत्या उन्हात आदिवासी मजूर महिलेची प्रसूतीची घटना सोमवार रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.

परिसरातील महिलांनी धाव घेत सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. शासनातर्फे गरोदर मातांकरिता मोठ्या प्रमाणात सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये आदिवासी समाजासाठी विशेष सुविधा असल्याचे सांगितले जाते. परंतु रस्त्यावर प्रसूती झालेल्या गरोदर मातेची अवस्था बघून त्यांच्यापर्यंत या सुविधा पोहोचत नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या वाडेगाव येथील एका शेतात आदिवासी कुटुंब मजुरीच्या उद्देशाने राहायला आले होते. गरोदर महिलेचे पोट दुखत असल्यांने महिला पतीसोबत खासगी दवाखान्यात तपासणी करण्यासाठी आली होती.

त्या महिलेला पोटात अचानक जास्त कळा येत असल्याने शेत मालकाने वाडेगाव येथील एका ऑटो रिक्षा चालकाला तत्काळ पाठविले. ऑटो रिक्षाने महिलेला रुग्णालयात घेवून जाण्यापूर्वीच महिलाला प्रसुती कळा वाढल्या व रस्त्यावरच महिलेने बाळाला जन्म दिला. हा प्रकार बघून परिसरातील आजू-बाजूच्या महिला तिच्या मदतीला धावून आल्यात.

कपड्यांच्या साहाय्याने आडोसा करून जागेवरच प्रसूती करण्यात आली. अर्चना लोध, ललिता गजानन पल्हाडे, अलका ज्ञानदेव पल्हाडे या महिलांनी सामाजीक जाणीवेतून प्रसुती झालेल्या महिलेची मदत करीत तिच्या बाळाला सुरक्षित ठेवले.

दरम्यान, ऑटो चालक चंदन ऋनांदेकर यांनी प्रसंगावधान राखून जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना बोलावून आणले. परंतु तोपर्यंत प्रसूती झाली होती. प्रसुतीनंतर डॉक्टरांच्या मदतीने महिलेला बाळासह सुरक्षितरित्या प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेगाव येथे पोहचविण्यात आले व पुढील उपचार सुरू करण्यात आले.

पुढील उपाचारासाठी अकोल्याला पाठविले

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना घटनेबाबत विचारले असता, त्यांनी ही महिला आपल्या परिसरातील नसून, वाशीम जिल्ह्यातील मुंगळा या गावतील आहे. त्या महिलेला आरोग्य केंद्रात आणले असता तिच्यावर उपचार करून त्यांना अकोला येथे पाठविण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

Latest Marathi News Update LIVE : नगरपरिषद निवडणूकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंधू आल्हाद कलोती बिनविरोध

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

SCROLL FOR NEXT