ई-फेरफारमध्ये अचलपूर तहसील अमरावती विभागात अव्वल  Sakal
विदर्भ

ई-फेरफारमध्ये अचलपूर तहसील अमरावती विभागात अव्वल

राज्यात सरासरी २० दिवसांचा कालावधी घेत नाशिक विभाग प्रथम क्रमांकावर आहे. सातबारा फेरफार हा सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचा दत्तवेज आहे.

राज इंगळे

अचलपूर : जमिनीचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी सातबारा तयार होणे आवश्यक असते, त्यासाठी फेरफार रुजू केला जातो. शासनाने ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शीपणे करण्यासाठी ई-फेरफार प्रणाली सुरू केली.

त्यासाठी कायद्यानुसार कालावधी ठरलेल्या कालावधीतच फेरफार रुजू करण्याच्या प्रक्रियेतील सरासरी दिवसांची संख्या पाहता अमरावती विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या विभागात अचलपूर तहसील प्रथम क्रमांकावर आहे.

राज्यात सरासरी २० दिवसांचा कालावधी घेत नाशिक विभाग प्रथम क्रमांकावर आहे. सातबारा फेरफार हा सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचा दत्तवेज आहे. पूर्वी हा सातबारा हस्तलिखित होता. मात्र, आता केंद्र सरकारने राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम सुरू केला असून जमीन व्यवस्थापन पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरज ओळखून सर्व सातबारा जमीन नोंदीचे संगणकीकरण केले.

त्यामध्ये खरेदी दस्त नोंदणी करणारे दुय्यम निबंध कार्यालय जोडण्यात आले. या प्रक्रियेत दुय्यम निबंधकांकडे झालेले खरेदी व्यवहार थेट संबंधित जमिनीचा फेरफार रुजू करण्यासाठी तहसीलच्या यंत्रणेकडे ऑनलाइन दिसू लागले. त्यामुळे व्यवहारांच्या नंतर फेरफाराच्या माध्यमातून नवीन सातबारा नोंदी सुरू झाल्या.

त्यासाठी कायद्यानुसार कालावधी ठरलेल्या कालावधीतच किंवा त्याहीपेक्षा कमी वेळात फेरफार रुजू करण्याच्या प्रक्रियेतील सरासरी दिवसांची संख्या पाहता अमरावती विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे, तर अमरावती विभागात अचलपूर तहसील प्रथम क्रमांकावर आहे.

सर्वच पातळीवर प्रशासन हे गतिमान असावे, ही सर्वसामान्यांच्या अपेक्षेसह शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न आहे. मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य होत आहे.

-डॉ. संजय गरकल, तहसीलदार, अचलपूर.

सर्वसामान्यांची कामे वेळेतच व्हावी, यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सातत्याने आढावा घेण्यात येतो. ज्यामुळे सेवा वेळेत मिळत आहेत. याचा आनंद आहे.

-श्यामकांत मस्के, सहायक आयुक्त, भूसुधार, अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT