Admission
Admission 
विदर्भ

ॲडमिशनच्या नावाखाली फसवणूक

सकाळवृत्तसेवा

नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेयो) आणि अमरावतीमध्ये डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेदिक रुग्णालय आणि महाविद्यालयात प्रवेशासाठी एका युवक आणि युवतीला आर्थिक फटका बसला असून त्यांना लाखोंनी गंडविले असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. 

विनोद अंबादास लोखंडे (वय ५६, रा. नरखेड) यांच्या मुलाला इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश हवा होता. त्यासाठी १३ ऑगस्ट २०१८ साली त्याची आरोपी सुमित सुशील तिवारी (वय २८, रा. जाफर नगर, प्लॉट नं. २०), निखिल गिरीपुंजे (वय २४, रा. भंडारा), मोहित, सिंग, सुजित तिवारी यांच्याशी भेट झाली.

त्यांनी लोखंडे यांच्या मुलाला एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देऊ असे सांगितले. याशिवाय २०१८ मध्ये उत्तीर्ण झालेल्या ‘नीट’ पात्रता परीक्षेच्या आधारावर प्रवेश मिळवून देण्याचीही ग्वाही दिली. ठरल्याप्रमाणे आरोपींनी विनोद लोखंडे आणि त्यांचे मित्र बेले यांना गिट्टीखदान परिसरातील जोशी हॉटेल येथे बोलावून घेतले. यावेळी त्यांना मूळ कागदपत्रे मागून घेत, कॉलेजच्या नावाने ‘डिमांड ड्राफ्ट’ तयार करण्यास सांगितले.

यानंतर चक्क महाविद्यालयात प्रवेशासाठी लागलेली खोटी गुणवत्ता यादी आणि प्रवेशाची पावती लोखंडे यांच्या ‘व्हॉट्‌सॲप’वर टाकून, वेळोवेळी पैसे घेत, ३६ लाखांचा गंडा घातला. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी विनोद लोखंडे महाविद्यालयात प्रवेशासाठी गेल्यावर त्यांना यावर्षीचा प्रवेश याच वर्षीच्या नीट परीक्षेतील निकालाच्या आधारावर होणार असल्याचे कळले. त्यामुळे आपली फसवणूक झाली हे कळताच, त्यांनी गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासणी करून पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. 

मानकापूर परिसरात दुसऱ्या घटनेत अमरावतीमधील डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेदिक रुग्णालय आणि महाविद्यालयात बीएएमएस अभ्यासक्रमात प्रवेश करून देण्याच्या नावावर आरोपी सचिन ज्ञानेश्‍वर अरबट (वय ३६, रा. वाठोडा, वरुड) या व्यक्तीने निकिता नामक वीसवर्षीय मुलीची १५ लाखांनी फसवणूक केली. सचिन सध्या अजनी येथील सुपर हॉस्पिटलच्या मागे वास्तव्यास आहे. 

त्याने निकिताला विश्‍वासात घेऊन तिला प्रवेश मिळवून देण्याचे सांगितले. त्यासाठी १५ लाखांची मागणी केली. हे पैसे दिल्यावर बरेच दिवस निघून गेल्यानंतरही प्रवेश होत नसल्याने तिने प्रवेशाबद्दल विचारणा केली. आरोपीने टाळाटाळ केल्याने निकिताने फसवणुकीची तक्रार मानकापूर पोलिसांकडे दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करून सचिन अरबट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT