विदर्भ

मटन मार्केट हटविण्या करीता ढोल वाजवा आंदोलन

सकाळवृत्तसेवा

चिमुर : चिमूर शहरातील  प्रभाग 12 मध्ये असलेल्या मटण व चिकन मार्केटमुळे होणाऱ्या दुर्गंधीने अंगणवाडी केंद्र बंद झाले आहे. तर जिल्हा परीषद उर्दू शाळा याच मार्केटला लागुन असल्याने विद्यार्थी, परिसरातील नागरीक व त्या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ह्या ठीकाणचे मटण व चीकन मार्केट हटविण्याच्या मागणी करीता चिमुर युवा क्रांती संघटनेच्या वतीने ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले.

चिमूर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग 12 मध्ये मटण व चिकन मार्केट अनेक वर्षा पासुन आहे. या मार्केटमुळे होणारी अस्वच्छता व दुर्गंधीच्या त्रासामुळे हे मार्केट हटविण्याकरीता अनेक संघटना, पक्षांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र मार्केट न हटता याच ठिकाणी असलेली अंगणवाडी केंद्र स्थलांतरीत झाली आहेत. याच मार्केट जवळ जिल्हा परीषद उर्दू शाळा असुन कोंबडे, बकरे कापल्याने इथे दुर्गंधी पसरते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने तसेच रस्त्यावर दुचाकी वाहने ठेवीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. इत्यादी समस्या दुर करण्याकरीता हे मटन माक्रेट इतरत्र हटविण्याचे निवेदन चिमूर युवा क्रांती संघटनेच्या वतीने नगर परीषद प्रशासणाला देण्यात आले होते.

या निवेदनात सात दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आले होते. यावर चिमूर नगर परीषदेने चिमूर युवा क्रांती संघटनेच्या अध्यक्षांना मुदत मागीतली होती. मात्र दिलेल्या निवेदना प्रमाणे सात दिवस झाल्यामुळे संघटनेच्या वतीने चिमूर नगर परीषदे पुढे ढोल वाजविण्यात तसेच फटाके फोडण्यात आले. अखेर नगर परीषद मुख्याधीकारी यांचे कडून तिन महिन्या मध्ये मटन चिकन मार्केट हटविण्यात येईल असे लेखी आश्वासन प्राप्त झाल्यानंतर आंदोलन बंद करण्यात आले. मात्र मुख्याधीकारी यांनी दिलेल्या मुदतीत मागणी पुर्ण केली नाही तर अशाच प्रकारे आगळे वेगळे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष विनोद शर्मा यांनी दिला आहे.

आंदोलन करणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षावर चिमूर नगर परीषदेतर्फे मोठ्या ढोल वाजवत आवाज व फटाके फोडल्यामुळे शासकीय काम करण्यास दोन तास अडथळा निर्माण झाला. या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली तसेच विना परवानगी सार्वजनिक ठीकाणी ढोल वाजवुन शांतता भंग केल्या बद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT