विदर्भ

‘ॲग्रोवन’ यशोगाथांमधील मॉडेलचा होणार प्रसार

विनोद इंगोले

नागपूर -  ‘ॲग्रोवन’मधील यशोगाथांची दखल घेत अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शिवारातील प्रयोगांची चाचपणी करून अशी मॉडेल इतरांसमोर नेण्यात येणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र ११ जिल्ह्यांत आहे. परंतु पुरेशा मनुष्यबळाअभावी कृषी विद्यापीठाच्या विस्तार कार्यास मर्यादा येतात. ही बाब लक्षात घेत कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विस्तार कामात ‘ॲग्रोवन’ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित यशोगाथांमधील प्रयोगशील शेतकऱ्यांचे मॉडेल इतरांपर्यंत पोचविले जाणार आहे. ‘ॲग्रोवन’मध्ये विदर्भातील ज्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रकाशित होतील, अशा शेतकऱ्यांच्या शेताला संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी भेटी देत संबंधित शेतकऱ्याने त्याच्या शेतावर राबविलेल्या प्रयोगांची माहिती घेतील. असे बांधावरील प्रयोग मग कृषी विद्यापीठ प्रक्षेत्र तसेच अन्य ठिकाणीही राबविण्यावर भर दिला जाणार आहे. अंजनगाव सूर्जी तालुक्‍यातील जवळा येथील रमेश मातकर यांची सेंद्रिय संत्रा उत्पादनाची यशोगाथा नुकतीच प्रकाशित झाली होती. दुष्काळी स्थितीतही मातकर यांनी दर्जेदार संत्रा उत्पादन घेतले. त्यांची यशकथा वाचल्यानंतर ही संकल्पना सुचल्याचे कुलगुरू डॉ. भाले यांनी सांगितले. 

‘ॲग्रोवन’मधील यशोगाथांची दखल घेत तज्ज्ञांना संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात पाठविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतातील माती, पाणी व इतर घटकांचे पृथ्थकरण करण्याचे प्रस्तावित आहे. त्याआधारे जमिनीची एकंदरीत रचना लक्षात घेऊन अशा प्रकारे किफायतशीर शेतीचे मॉडेल अन्य शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT