manutai school
manutai school 
विदर्भ

मनुताई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींची मुंबईत विजयी पताका!

मनोज भिवगडे

अकोला : मनूताई कन्या शाळेच्या इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थिनींनी काजल राजवैद्य यांच्या मार्गदर्शनात दैनंदिन समस्यांचे निराकरण करणारा ‘रोबोट’ तयार करून मुंबईतील फर्स्ट लिगो लीग स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविला आहे. देशपातळीवरील या स्पर्धेत अकोल्याला मिळालेले हे पहिलेच यश आहे. आता या विद्यार्थिनींनी अमेरिकेतील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 


मुंबई लिगो एज्युकेशन ही ऑर्गनायझेशन दरवर्षी फर्स्ट लिगो लीग रोबोट स्पर्धेच आयोजन करते. ही स्पर्धा 18 व 19 जानेवारी रोजी मुंबईला आयोजित करण्यात आली होती. या लीगमध्ये अकोल्यातील मनुताई कन्या शाळेतील 14 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यासाठी लिगो एज्युकेशन ऑर्गनायझेशनने विद्यार्थिनींना रोबोट बनविण्यासाठी साहित्य पुरविले. या विद्यार्थिनींना किट्स रोबोटिक्सच्या संचालक व रोबोट तज्ज्ञ काजल राजवैद्य, शिक्षक विजय भट्टड यांनी तसेच त्यांच्या सामाजिक बांधिलकी विभागानेसुद्धा मार्गदर्शन व मदत केली. या विद्यार्थिनींनी अत्यंत कल्पकतेने छोट्या पार्ट्सचा वापर करून रोबोट तयार केला. त्याचे डिझाइन, प्रोग्रॅमिंग स्वत: तयार केले. हा रोबोट स्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. 

मुक्या भावनांना दिले कल्पनांच्या शब्दाचे बळ!
मनुताई कन्या शाळेतील ज्या विद्यार्थिनींना त्यांच्या भावनाही शब्दात व्यक्त करता येत नव्हत्या, त्यांना कल्पनांच्या शब्दांचे बळ देत रोबोट तयार करण्यासाठी रोबोट तज्ज्ञ काजल राजवैद्य आणि मुख्याध्यापिका डॉ. वर्षा पाठक यांनी प्रेरीत केले. आज त्यांच्या या परिश्रमांना यशाचे फळ मिळाले आहे. रोबोट बनविणाऱ्या या विद्यार्थिंनी मराठी माध्यमात शिकत असून, त्यांचे आई-वडील शेतमजुरी करतात. शहरालगतच्या छोट्या गावांमधून येणाऱ्या विद्यार्थिनींकडे ऑटोरिक्षाने शाळेत यायलासुद्धा पैसे नसतात. बऱ्याचदा या विद्यार्थिनी शाळेत पायी येतात. रोबोटच्या उपयोगिता सांगण्यासाठी विद्यार्थिनींनी अत्यंत मेहनत घेतली असून, इंग्रजीमध्ये त्यांनी छान मांडणी केली. त्यामुळेच त्यांना हे यश मिळविता आले. 

संकटातील मदतीची संकल्पना भावली!
मनुताई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी बनविलेला रोबोट ट्रॅफिक जाम, नैसर्गिक आपत्ती, संकटात सापडलेल्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे काम करतो. यासोबतच झाडांवर ट्री हाऊस तयार करण्याचे काम करतो. क्रेन चालविण्यासाठी, बांधकाम साहित्य, मटेरियल्स पोहोचविण्यासाठीसुद्धा रोबोटची मदत होते. याशिवाय हा रोबोट उंचीवरसुद्धा चढू शकतो. या सर्व संकल्पना परीक्षकांना भावल्यात. 

सांघिक भावनेचा विजय 
शहरातील 110 वर्षे जुन्या मनूताई कन्या शाळेत शिकणाऱ्या रुचिका मुंडाले, निकिता वसतकार, स्नेहल गवई, अर्पिता लंगोटे, सानिका काळे, गौरी झामरे, आंचल दाभाडे, पूजा फुरसुले, सायली वाकोडे, अंकिता वजिरे, समीक्षा गायकवाड, प्रांजली सदांशिव, गायत्री तावरे, प्रणाली इंगळे यांनी सांघिक भावनेतून हा रोबोट बनविला. स्पर्धेत त्याची प्रभावी मांडणी केली. सांघिक भावनेतूनच आजचे हे यश मिळाले. 

शहरातून काढली मिरवणूक
मुंबईतील रोबोट स्पर्धेत विजय मिळवून अकोल्यात परतलेल्या मनुताई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींची व त्यांच्या मार्गदर्शकांची खोलेश्‍वर परिसरातून वाजगाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या विद्यार्थिंनीचा व त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT