विदर्भ

हद्दवाढीतील प्रभागांसाठी मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट

सकाळवृत्तसेवा

अकोला : हद्दवाढीनंतर महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावातील विकास कामांच्या आराखड्यास राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २६ आॅक्टोबर रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. ९६ कोटीचा प्रस्ताव मान्य करून विकास कामांचा मार्ग मोकळा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीतील नागरिकांना दिवाळी भेट दिली आहे. 

अकोला महापालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर मनपा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या परिसरासाठी प्रशासनाने १०० कोटीचा विकास आराखडा तयार केला होता. हा आराखडा शासनाने १४ मार्च २०१८ रोजी मंजूर केला होता. त्यानंतर २० कोटी रुपये मनपाला देण्यात आले. त्यात मनपाला पाच कोटी रुपयांचा मॅचिंग फंड टाकावयाचा आहे.

त्यानंतर या प्रस्तावित आराखड्यानुसार अमरावती येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे सोशल आॅडिट करण्यात आले होते. आराखड्यानुसार प्रस्तावित कामे त्या भागाच्या गरजेनुसार आहेत किंवा नाही याची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर या कामांचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हा प्रशासनामार्फत हा प्रस्ताव राज्य शासनाकडे २९ आॅगस्ट २०१८ रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रशासकीय मान्यता देवून २६ आॅक्टोबर रोजी ९६ कोटी २९ लाख ६९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील २०कोटींचा निधी आधीच मिळाला आहे.  

लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा
हद्दवाढीतील बहुतांश भाग अकोला पूर्व मतदारसंघात येतो. या भागाचा विकास व्हावा म्हणून अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्यासह खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा यांनी सातत्याने पाठपुरवा करून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांमार्फत मंजूर करून घेतला. 

कामांचे विलगिकरण ठरेल गंभीर अनियमितता
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अकोला महापालिकेच्या हद्दीतील विकास कामांना प्रशासकीय मान्यता देताना प्रभागनिहाय एकत्रित प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसारच प्रभागातील कामांची एकत्रित निविदा प्रक्रिया राबवायची आहे. कामांचे विलगिकरण करून कार्यारंभ आदेश दिल्यास ती गंभीर अनियमितता ठरेल, अशी अट प्रस्ताव मंजूर करताना टाकण्यात आली आहे.    

मनपाच्या हद्दवाढीनंतर शहराचा भाग झालेल्या परिसरात तातडीने विकास कामे करणे गरजेचे होते. अविकसित भागात गरजेनुसार प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मान्यता देवून अकोलेकरांना दिवाळी भेट दिली आहे. 
- आमदार रणधीर सावरकर, अकोला पूर्व

हद्दवाढीतील प्रभागात प्रस्तावित कामांचा आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आलेला या आराखड्याला प्रशासकीय मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिल्याने विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वीच २० कोटी मिळाले असून, मनपा त्यात पाच कोटी मॅचिंग फंड टाकणार आहे. ही कामे लवकरच सुरू होतील. 
- विजय अग्रवाल, महापाैर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT