तरूणांना खुणावताहेत डोंगरकडा!
तरूणांना खुणावताहेत डोंगरकडा! 
विदर्भ

तरूणांना खुणावताहेत डोंगरकडा!

विवेक मेतकर

साहसी क्रीडा प्रकारात गिर्यारोहणाला पसंती

अकोला: नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या वऱ्हाडातील तरूणांना साहसी क्रीडा प्रकारात रस वाढू लागला आहे. सातपुड्यातील डोंगरकडा त्यांना खुणावताहेत. अकोट येथील दिव्यांग गिर्यारोहक धीरज कळसाईत त्याचेच एक उद्‍हारण आहे.

गिर्यारोहण एक साहसी क्रीडा प्रकार... सध्या तरुणांमध्ये गिर्यारोहणाची आवड वाढली असून, कळसूबाई, लिंगाणा, रायगड, वासोटा, माऊंट सतोपंत यासारख्या ठिकाणांना गिर्यारोहकांची प्रथम पंसती मिळत आहे. शहरातील अजिंक्य ॲडव्हेंचर गृप, अजिंक्य फिटनेस पार्क, युथ होस्टेल, रोटरी संस्थांच्या सहकार्याने प्रशिक्षण देऊन गिर्यारोहणासाठी प्रोत्साहित केले जाते.

स्पोर्ट वॉल क्लाईम्बिंग करिता शहरातील ज्ञानदिप कॉन्व्हेंटमध्ये विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाची क्लायम्बिंग वॉल आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अनुपकुमार श्रीवास्तव यांच्या काळात शहरात क्लायम्बिंग वॉलसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. शहरात होत असलेल्या क्रीडा संकूलात या कामाला गती आली असून, भविष्यात अशाप्रकारच्या वॉल निर्माण होऊन ट्रेकिंगविषयी प्रशिक्षण देणे सोयीचे होईल. २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्पोर्ट वॉल क्लाईम्बिंगचा सामावेश करण्यात आला असल्याने गिर्यारोहणाकडे तरुणांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत होईल, असे धनंजय भगत यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

अकोला शहरातील अमोल पवार, अश्वीन दाते, अमित सदांशिव, स्वप्नील बढे, राहूल ओईंबे, व्यंकटेश मुजुमदार, महादेव भागरे, अंकुश डोंगरे, पूजा जंगम, राधिका येवले, निखील गोरे, दीक्षा भगत, धनंजय भगत, नीलेश डेहनकर, धीरज रविंद्र कातखेडे, हेमंत थेटे अशी गिर्यारोहकांची लांबलचक यादी आहे. केवळ गिर्याहोरण हा क्रीडा प्रकार म्हणूनच त्याच्याकडे न बघता रोजगार उपलब्ध करून देणारा हा क्रीडा प्रकार म्हणून पुढे येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग, पुरातत्व विभाग, वन्य प्राण्यांच्या रेस्क्युसह आपत्ती व्यवस्थापनासारख्या उपक्रमात गिर्यारोहकांची गरज भासते. त्यावेळी हाैशी गिर्यारोहक हिरीरीने पुढे येताना दिसतात.

एव्हरेस्टसाठी प्रयत्न सुरू
विदर्भातील गिर्यारोहकांकडून अजून एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत झाले नाही. त्यासाठी शहरातील गिर्यारोहकांचे प्रयत्न सुरू आहेत. फक्त गरज आहे ती सामाजिक संस्था किंवा व्यक्तीकडून मदतीचे हात पुढे करण्याची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT