Amitabh-Bachchan
Amitabh-Bachchan 
विदर्भ

बिग बींना मिळाला खटिया पर लेटने का सौभाग्य!

सकाळवृत्तसेवा

नागपूर - महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंतच्या आयुष्यात जगभरातील अनेक सुंदर शहरांमध्ये चित्रपटांचे ‘शूटिंग’ केले. ऐशोआराम, फाइव्ह स्टार व लक्‍झरी लाइफ अनुभवले. मात्र नागपुरातील ‘शूटिंग’दरम्यान त्यांना वेगळे जग पाहायला व अनुभवायला मिळते आहे. बुधवारी त्यांना असाच काहीसा अनुभव आला. बिग बी यांनी चक्‍क गावखेड्यांमध्ये नजरेस पडणाऱ्या बैलबंडी व बसमधून प्रवास करून आपल्या चाहत्यांना आणखी एक सुखद धक्‍का दिला.

नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित व नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या हिंदी चित्रपटाचे शूटिंग सध्या नागपूर व आजूबाजूच्या परिसरात धडाक्‍यात सुरू आहे. चित्रपटात शहरी व ग्रामीण भागाचे चित्र असल्यामुळे अशा विविध ‘लोकेशन्स’वर सध्या शूटिंग सुरू आहे. मंगळवारी शहराला लागून असलेल्या जंगली भागातील एका गावात चित्रपटाचे शूटिंग झाले. यात बिग बी हे बैलबंडीत बसून ढवढ्या-पवळ्यांसोबत घराकडे जात असल्याचे चित्रीकरण करण्यात आले.

चाकोलीतून बैलबंडीतून जाण्याचा शॉट ‘ओके’ केल्यानंतर, ते पायवाटेने मातीगोट्यातून बरेच दूरपर्यंत पायी चालत गेले. दोन तासांच्या प्रवासानंतर दमलेले बिग बी नंतर खाटेवर बसले. जवळपास अर्धा ते पाऊणतास ते आभाळाकडे टक लावत खाटेवर शांतपणे बसून होते. बच्चन खूप उंच असल्यामुळे गुडघ्यापासून त्यांचे पाय अगदी खाटेच्या खाली आले होते. शिवाय शूटिंगदरम्यान त्यांनी बसमध्येही प्रवास केला. 

हा ग्रामीण भागातील अविस्मरणीय अनुभव अमिताभ यांनी आपल्या चाहत्यांसाठी खास ब्लॉगवर हिंदीत ‘शेअर’ केलाय. ‘‘बड़े दिनों के बाद, गाँव की खटिया पर लेटने का सौभाग्य प्राप्त हुआ, बैल गाड़ी और बस में सफर करने का...’’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

जंगल में शांती का परिचय
‘जंगल में उसकी शांती का परिचय प्राप्त हुआ’ असे ट्विटही बिग बी यांनी केले. धकाधकीच्या आयुष्यापासून दूर ग्रामीण भागातील ‘लाइफ’ अगदी जवळून पाहताना मनाला खूप आनंद व समाधान मिळाल्याचे ते यावेळी म्हणाले. गावातील साधी माणसे त्यांना खूप भावली. या छोट्याशा प्रवासादरम्यान खूप काही शिकायला मिळाल्याचे ते म्हणाले. बिग बी यांनी शूटिंगमध्ये सहभागी झालेल्या सहकारी कलावंतांशीही भावना ‘शेअर’ केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT