file photo
file photo 
विदर्भ

अमरावती : मेळघाटातील बाइक ऍम्बुलन्स धूळखात

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या बाइक ऍम्बुलन्स (दुचाकी रुग्णवाहिका) मागील चार-पाच महिन्यांपासून मेळघाटात धूळखात पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

त्यामुळे लाखो रुपये खर्च करून विकत घेतलेल्या बाइक ऍम्बुलन्स सध्या अखेरच्या घटका मोजत आहेत.
संपूर्ण राज्यात रुग्णांना तत्काळ वेळेवर उपचार मिळावे म्हणून शासनाच्या वतीने तीन वर्षांपूर्वी बाइक ऍम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली होती.

यामध्ये अमरावती जिल्ह्यातील मेळघाटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, मेळघाटातील पाच बाइक ऍम्बुलन्सपैकी चार ठिकाणची सेवा सध्या बंद झाली आहे. यामध्ये हतरू, काटकुंभ, हरिसाल, टेंब्रुसोंडा या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

परिणामी या ठिकाणच्या बाइक ऍम्बुलन्स धूळखात पडून आहेत. बाइक ऍम्बुलन्ससाठी 108 या मोफत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर दुचाकी रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होत असे. त्यामुळे रुग्णांवर प्राथमिक उपचार सुरू करणे शक्‍य होत होते.

ही रुग्णवाहिका प्रशिक्षित डॉक्‍टरांमार्फत चालवली जात असल्याने त्यांच्यासोबत आवश्‍यक औषधे, श्‍वसनमार्गावरील उपचारांसाठी लागणारी उपकरणे, तसेच इतर वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असत. अपघातातील पहिल्या एका तासाच्या काळात रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी ही सेवा आवश्‍यक आहे.

तसेच राज्यातील आदिवासी पाड्यांवर रुग्णवाहिका जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा पोहोचविण्यासाठी ही सेवा उपयुक्त आहे. विशेष म्हणजे, अतिदुर्गम भागांत ही सेवा उपयुक्त ठरली आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात ही बाइक ऍम्बुलन्स सेवा सुरुवातीपासून अपयशी ठरली.

डॉक्‍टरांना वेळेवर मानधन मिळत नसल्याने यातील चार डॉक्‍टरांनी या सेवेला रामराम ठोकला असल्याची माहिती समोर आली आहे. मेळघाटात आपत्कालीन परिस्थितीत ही सेवा कर्मचाऱ्याअभावी मिळत नसल्याने आदिवासींच्या चिंतेत भर पडली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

कर्मचारी सोडून गेले
मेळघाटातील पाचपैकी चार ठिकाणची बाइक ऍम्बुलन्स सेवा बंद आहे. या ठिकाणचे कर्मचारी सोडून गेल्याने ही सेवा बंद झाली आहे. वरिष्ठ स्तरावर माहिती देण्यात आली असून कर्मचारी नियुक्तीसंदर्भात प्रयत्न सुरू आहेत.
- राकेश पेशाने, जिल्हा व्यवस्थापक, अमरावती.

लवकरच सुरू होणार सेवा
मेळघाटातील पाचपैकी चार ठिकाणची सेवा बंद असल्याची माहिती मिळाली. नवीन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपण्याच्या मार्गावर आहे. येत्या तीन-चार दिवसांत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून सेवा पूर्ववत सुरू केली जाईल. सोबतच बाइक ऍम्बुलन्स सेवा खंडित होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
-डॉ. दीपक उके, विदर्भ व्यवस्थापक, आपत्कालीन सेवा अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT