Amravati Division CM Office Inograted by Piyush Singh
Amravati Division CM Office Inograted by Piyush Singh 
विदर्भ

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, अमरावतीत विभागीय "सीएमओ' कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा

अमरावतीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या घोषणेनुसार येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी (ता. 20) मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (सीएमओ) कार्यान्वित करण्यात आला. विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‌घाटन करण्यात आले.

विभागातील जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावरील कामे याबाबतचा मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला जाणारा पत्रव्यवहार, निवेदने, तक्रारी मुंबईस्थित मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे पाठविली जातात. त्यात आणखी पारदर्शकता, लोकाभिमुखता आणि गतिमानता यावी यासाठी विभागीय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष उघडण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.

विभागीय आयुक्त कार्यालयातील या कक्षासाठी आवश्ययक पदांची निर्मिती व त्यानुसार मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. तूर्त उपलब्ध मनुष्यबळातून मुख्यमंत्री सचिवालय कक्षाला सुरुवात करावी. या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून विभागीय महसूल उपायुक्त असतील. त्यांच्या दिमतीला एक नायब तहसीलदार, प्रत्येकी एक लिपीक व टंकलेखक असे मनुष्यबळ नेमण्याची सूचना मुख्य सचिव अजोय मेहता यांनी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांना केली होती. त्यानुसार अमरावती विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचा पदभार विभागीय महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे यांच्याकडे देण्यात आला. नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्यासह दोन लिपीक देण्यात आले. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, संजय पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT