File photo
File photo 
विदर्भ

नियोजनाच्या अभावात विद्रुपीकरणाचा डाव

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : एकीकडे शहरातील मुख्य मार्ग सिमेंट कॉंक्रिटीकरणाने चकाचक होत असताना दुसरीकडे पार्किंग तसेच फेरीवाल्यांची योग्य ती व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील रस्ते वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी आहे की पार्किंग व फेरीवाल्यांसाठी, याचा अंदाज घेणे अमरावतीत कठीण झाले आहे. शहराचा मुख्य भाग असलेल्या राजकमल, श्‍याम चौक, जयस्तंभ, जवाहरगेट, राजापेठ, नवाथे, बसस्थानक, रुक्‍मिणीनगर, गोपालनगर, यशोदानगर, या भागातील मुख्य मार्गाने आपली वाहने चालविणेसुद्धा नागरिकांना कठीण झाले आहे. ही समस्या फोफावण्यास महापालिका जेवढी जबाबदार आहे, तेवढाच पोलिस प्रशासनाचा नसलेला वचकसुद्धा कारणीभूत आहे. शहरात फोफावत असलेले रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात या पाच वर्षांत प्रशासनाकडून कोणत्याही ठोस हालचाली झालेल्या नाहीत. पोलिस प्रशासनाला सोबत घेऊन शहरात अतिक्रमणमुक्त रस्ते करण्यासाठी कुठलीच मोहीम राबविण्यात आली नाही. शहरातील कमी वर्दळीच्या किंवा अंतर्गत रस्त्यांचा विषय बाजूला ठेवला तरी अगदी शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकातील पार्किंग व त्यामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी मनपातील सत्ताधारी किंवा येथील अनुभवी ज्येष्ठ लोकप्रतिनिधींनासुद्धा का दिसत नाही? हा नागरिकांचा सवाल आहे.
या प्रश्‍नाच्या मुळाशी गेल्यास प्रशासनाकडून मोठ्या इमारतींच्या बांधकामाची देण्यात येणारी परवानगी व बांधकाम झाल्यावर त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे दिसून येते. शहरातील बहुतांश मोठ्या इमारतींनी पार्किंगच्या जागा गिळंकृत केल्यावरसुद्धा संबंधितांवर कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. पार्किंगच्या जागेवरील दुकाने जैसे थे आहेत. पार्किंग किंवा हॉकर्स झोनवर सक्तीने अंमलबजावणी होताना दिसत नाही. म्हणूनच पार्किंगच्या जागेवर दुकान, त्यापुढे फेरीवाल्यांचे बस्तान त्यापुढे दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा असे चित्र रस्त्याच्या दुतर्फा दिसत असल्याने सर्वसामान्य वाहनचालक व पादचाऱ्यांना आवागमन करण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नसल्याची गंभीर स्थिती आहे.
वाहतुकीचा हा प्रश्‍न काही अंशी सोडविण्याच्या दृष्टीने उड्डाणपुलाचे जाळे शहराच्या काही भागात वेढल्या जात आहे. पठाण चौक ते चौधरी चौक हा नवा उड्डाणपूल होत आहे. राजापेठच्या आरओबीचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, राजकमल व मुख्य बाजारपेठेतील प्रश्‍न या पुलांमुळे निकाली निघणार नाही, हे वास्तव आहे.
पर्याय उपलब्ध
राजकमल, जयस्तंभ, श्‍याम चौक ही पार्किंग हॉकर्स झोन नेहरू मैदानात हलविल्यास मुख्य बाजारपेठेतील प्रश्‍न निकाली निघू शकतो. सोबतच शहरातील मोठ्या इमारतीतील पार्किंगच्या जागा सक्तीने मोकळ्या केल्या गेल्या पाहिजेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT