File photo
File photo 
विदर्भ

नायजेरियनला ताब्यात घेण्यासाठी आंध्र प्रदेश पोलिस अमरावतीत

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : नायजेरियन टोळीपैकी एकाला ताब्यात घेण्यासाठी आंध्र प्रदेशच्या सीआयडी पोलिसांचे चार जणांचे पथक अमरावतीमध्ये दाखल झालेले आहे. 66 लाखांच्या अपहारप्रकरणी 2018 मध्ये राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या अपहारप्रकरणात दोन नायजेरियन युवकासह त्यांची एक वैदर्भीय मैत्रीण अशा एकूण सात जणांविरुद्ध फसवणूक, अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी फिलीप इफेसिनाची ऊर्फ डॉ. जानसन बोबो हा नायजेरियन न्यायालयीन कोठडीत अंतर्गत अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र, त्याच्या वैदर्भीय मैत्रिणीला जामीन मिळाला आहे.
अकीकबरा या सीड्‌सचा पुरवठा करण्याच्या नावाखाली शहरातील एका मोठ्या व्यापाऱ्यासोबत या टोळीने खोटे नाव सांगून, संपर्क साधला होता. त्यापैकी डॉ. जानसन ऊर्फ बोबो असे बनावट नाव सांगून फिलीप इफेसिनाची हा अमरावतीत या व्यापाऱ्याच्या घरापर्यंत पोहोचला होता. व्यापारीही त्याच्या आमिषाला बळी पडला व आपली मालमत्ता गहाण ठेवून या टोळीला टप्प्याटप्प्याने 66 लाख रुपये दिले होते. आंध्र प्रदेशमध्येही अशाच प्रकारचा अपहाराचा गुन्हा दाखल झाला असून, त्यात फिलीपचा समावेश असल्याचे धागेदोरे तपास करणाऱ्या सीआयडी पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे त्याला कारागृहामधून ताब्यात घेण्यासाठी आंध्रच्या सीआयडी पोलिसांनी न्यायालयात शनिवारी (ता. 21) अर्ज सादर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT