Armed clashes between two groups
Armed clashes between two groups  
विदर्भ

अमरावतीत दोन गटांत सशस्त्र चकमक 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरातील नागपुरीगेट परिसरातील ताजनगर (क्र. 1) मध्ये जुन्या वैमनस्यातून दोन गटांमध्ये गुरुवारी सशस्त्र चकमक उडाली. त्यात तीनजण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. परस्परविरुद्ध तक्रारीवरून दोन्ही गटांतील आठ जणांविरुद्ध नागपुरीगेट ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 
जमीर खान सलीम खान, सय्यद अजहर अली यांच्यासह अन्य एक अशी या हल्ल्यातील जखमींची नावे आहेत. हिना परवीन आरीफ खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सय्यद अजहर अली गुलाम अली, सोनू यांसह अन्य दोन महिलांविरुद्ध, तर महिलेच्या तक्रारीवरून सलीम खान मिया खान, सलमान खान, अमीर खान यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारपर्यंत (ता. 18) त्यातील कुणालाही नागपुरीगेट पोलिसांनी अटक केली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT