yawatmal
yawatmal 
विदर्भ

यवतमाळ : बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : बनावट भारतीय नोटा बनवून त्या चलनात आणणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून साडेसहा लाखाच्या नोटा जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. 7) सकाळी साडेदहाला तिवसा नजीक केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सोमवारी (ता. 8) दिली.

प्रधनेश रुपेश पाटील (वय 27, रा.ब्रम्ही ता.दारव्हा) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. चारचाकी वाहनाने यवतमाळला येत असल्याची टीप पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने तिवसा नजीक सापळा रचला. वाहनाची तपासणी केली असता, त्यात 14 हजार 800 रुपयांच्या नोटा आढळल्या. सदर नोटांचा क्रमांक एकच असल्याने त्या नोटा बनावट असल्याची खात्री पटली. त्याने या नोटा ब्रम्ही या राहत्या गावी बनविल्याचे सांगितले. त्यासाठी मित्र किशोर आसरकर(रा.कुंभारकीनही) यांच्या मदतीने बनविल्याचीही कबुली दिली.

प्रज्ञेश याच्या गविजाऊन घराची झडती घेतली. एक स्कॅनर, इंक बॉटल, पेपर कटर, स्केल, सहा लाख 77 हजार 800 रुपयांच्या नोटा, साहित्य, वाहन, असा एकूण आठ लाख 42 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचा साथीदार किशोर आसरकर फरार आहे.प्रज्ञेश विरुद्ध बनावट नोटा व गडफोडीचा गुन्हाही नोंद आहे. एलसीबी पथकाने ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, बंडू डांगे, गजानन धात्रक, विशाल भगत, किरण पडघन, निलेश भुसे, मोहम्मद जुनेद यांनी केली.

एलसीबी पथकाने केलेली ही मोठी कारवाई आहे. पान टपरी, पेट्रोल पंप, ग्रामीण भागात बनावट नोटा चालवत होते. पोलिस कोठडीत त्याच्याकडून पुन्हा माहिती समोर येईल.
- एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक यवतमाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT