lok_20kalavant
lok_20kalavant 
विदर्भ

Video : हजारो वृद्ध कलावंतांना लाल फितीत अडकलेल्या शासकीय मानधनाची प्रतीक्षा, वर्षभरापासून आहेत वंचित

प्रशिक मकेश्वर

अमरावती :  महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदे अंतर्गत वयोवृद्ध कलावंतांना दर महिन्याला मानधन दिले जाते मात्र नोंदणीकृत वयोवृद्ध कलावंतांना गेल्या वर्षाभरापासून मानधन मिळाले नाही शासनाच्या काही नियम अटींमुळे अनेकांना मानधनाला मुकावे लागत आहे. त्यातच कोरोना महामारी असल्याने मोठ्या अडचणीचा सामान करावा लागत आहे. त्यामुळे शासनाकडे मानधन मिळण्याची आर्त विनवणी जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंत करीत आहेत.

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांच्यासारख्या थोर संतांनी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करीत समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. त्यांचा वारसा जपत भजन कीर्तनाच्या माध्यमातून अनेक वयोवृद्ध कलावंत तळागाळात समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.



तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील कवी शंकरराव थोरात यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून समाजप्रबोधनाचे कार्य केले. वयाच्या पंधराव्या वर्षापासून घरातील ताटे वाजवून परिसरात ते प्रबोधनाचे कार्यक्रम घेत होते. यासोबतच ते उत्तम कवी असून त्यांनी अनेक गीते लिहिली आहे. आकाशवाणीवरही त्यांचे अनेक कार्यक्रम गाजले आहेत. अंधश्रद्धा दूर व्हावी, दारूबंदी व्हावी. यासारख्या जनजागृतीच्या कार्यक्रमाला ते प्रथम प्राधान्य देत होते. थोरात यांना यासाठी अनेक प्रमाणपत्र मिळाले असून दिल्ली व मुंबईला त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे. शासनाच्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेला प्रबोधनकार कवी शंकरराव थोरात मानधनापासून मात्र अजूनही वंचित आहे.

जिल्ह्यातील नोंदणीकृत वयोवृद्ध कलावंत शासनाकडे मानधनाची मागणी करीत आहेत. कोरोना संकटामुळे आर्थिक कोंडी झाली आहे. सर्वसामान्यांना लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला असून अनेकांचे रोजगार सुद्धा बुडाले आहे. वयोवृद्ध कलावंतांकडे रोजगारचे कुठलेही साधन नसल्याने त्यांचे मानधन रोखू नये अशी कलावंतांकडून मागणी होत आहे.

सविस्तर वाचा - ब्रेकिंग न्युज - नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात, एक पोलिस जवान शहीद, दुसरा जखमी

समिती गठित करण्याकरिता होत आहे उशीर
जानेवारीमधील शासन परिपत्रकानुसार साठ ऐवजी १०० वृद्ध कलावंताची निवड करण्याचे आदेश आहेत. मात्र या बाबीला उशीर होत असल्याने वृद्ध कलावंतांना मानधनासाठी वाट पाहावी लागत आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT