file photo
file photo 
विदर्भ

पावसाने गाठली सरासरी

सकाळ वृत्तसेवा


नागपूर : अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर व जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मोठा खंड पडल्यानंतर यंदा पाऊस सरासरी गाठेल की नाही, याबाबत शंका होती. हवामान विभागाला दोष देण्यात येत होता. मात्र, आठवडाभराच्या दमदार पावसाने नागपूर जिल्ह्यासह विदर्भातही सरासरी गाठली आहे. शहरात बुधवारी दिवसभर सरींवर सरी कोसळल्या. मात्र, गुरुवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत.
मंगळवारच्या संततधारेनंतर आजही शहरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. मात्र, कालच्या तुलनेत पावसाचा जोर कमी जाणवला. त्यामुळे दिवसभरात केवळ 10.8 मिलिमीटरचीच नोंद होऊ शकली. विदर्भात मॉन्सून सक्रिय असल्याने सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला. गेल्या चोवीस तासांत यवतमाळ येथे 132.8 मिलिमीटर, वर्धा येथे 128.4 मिलिमीटर, अमरावती येथे 101.6 मिलिमीटर, नागपुरात 87.1 मिलिमीटर, वाशीम येथे 54 मिलिमीटर, ब्रह्मपुरी येथे 47 मिलिमीटर, अकोला येथे 39.2 मिलिमीटर, गडचिरोली येथे 34 मिलिमीटर, चंद्रपूर येथे 31.1 मिलिमीटर, बुलडाणा येथे 29 मिलिमीटर नोंद करण्यात आली. सर्वाधिक 175 मिलिमीटर पाऊस भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्‍यात पडला.
शहरात 465 मिलिमीटर
गेल्या सहा-सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तूटही भरून निघाली आहे. 31 जुलैपर्यंत विदर्भात 428 मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीच्या (477 मिलिमीटर) केवळ 10 टक्‍के कमी आहे. हवामान विभागाच्या भाषेत हा सरासरी पाऊस मानला जातो. नागपूर जिल्ह्यात मात्र पावसाने सरासरी गाठली. जिल्ह्यात सरासरी 470 मिलिमीटर अपेक्षित असताना आतापर्यंत 465 मिलिमीटरची नोंद करण्यात आली, जो केवळ सरासरीच्या एक टक्‍का कमी आहे. बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, यवतमाळ, वाशीम आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी 31 टक्‍के पावसाची तूट कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT