babasaheb dhabekar 
विदर्भ

विकासपुरुष बाबासाहेब धाबेकर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब धाबेकर यांचे मंगळवार (ता. 5) मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. गत काही महिन्यांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या बाबासाहेबांनी मंगळवारी सकाळी 11.30 वाजता अखेरचा श्‍वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. बुधवारी (ता. 6) दुपारी 12 वाजता धाबा येथे त्यांच्या घरी अंत्यदर्शनानंतर अंतिम संस्कार करण्यात येतील. 

बार्शिटाकळी तालुक्‍यातील धाबा गावातील ग्रामपंचायत सदस्य पदापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. उपसरपंच, सरपंच, बार्शिटाकळी पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जि. प. सभापती नंतर अध्यक्ष असा प्रवास करीत त्यांनी कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविली आणि त्यात ते विजयीसुद्धा झाले. 

आमदार झाल्यानंतर शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला. याच सरकारमध्ये त्यांची कॅबिनेटमंत्रिपदी वर्णी लागली. जलसंधारण खाते त्यांच्याकडे आल्यावर त्यांनी महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांना गती दिली. यासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले. त्यांनी 2009 मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढविली होती. 

सुतगिरणी, साखर कारखाण्यांची उभारणी 
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना धाबेकरांनी विकासकामांचा धडका लावत अकोला जिल्हा परिषदेला राज्यात वेगळी ओळख निर्माण करून दिली. सुतगिरणी, साखर कारखाण्यांची उभारणीही त्यांनी केली. रोखठोक भूमिका घेणारे नेते व विकास महर्षी म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख होती. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे व मैत्रिपूर्ण संबंध होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

महिलांचे महिला व बालविकास कार्यालयात हेलपाटे! मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’ना दरमहा लाभ नाहीच; २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना करता येईना अर्ज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ३ महिने आधी समजणार वेळापत्रक; विद्यापीठाची पहिली सत्र परीक्षा ऑक्टोबरमध्ये, द्वितीय सत्र परीक्षा मार्चअखेर

विशेष : शब्दांपासून आकर्षक आकृतीपर्यंत

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

SCROLL FOR NEXT