file photo
file photo 
विदर्भ

बॅंक ऑफ बडोदाची तीन कोटींनी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कृषक जमिनीला अकृषक दाखवून तीन कोटी रुपयांचे कर्ज उचल करून बॅंकेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी सहा बॅंक अधिकाऱ्यांसह एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही.
संजय मोटुमल कुकरेजा (44) रा. देव एन्क्‍लेव्ह अपार्टमेंट, कुशीनगर, महेश उदरनमल भटेजा (41) रा. लक्ष्मी पॅलेस, कुशीनगर, अजय गंगाधर सुटे (41) रा. धडीवाल ले-आउट, वामन हेडाऊ (61) रा. इंद्रप्रस्थ ले-आउट, वाडी, ध्रितेश सुनील मन्ना (32) रा. औरंगाबाद, रमेश चंद्रभान लांबाहाते (53) रा. अयोध्यानगर, राजेश महावीरप्रसाद खरे (63) रा. अभ्यंकरनगर आणि विजय रामचंद्र पेटकर (54) रा. दयालु सोसायटी, जुना जरीपटका अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींपैकी संजय कुकरेजा यांची नारा परिसरात जवळपास एक एकर शेती आहे. ती शेतजमीन पडीत असून शासकीय दस्तावेजावर ती कृषक जमीन आहे. आरोपी संजय कुकरेजाने जमिनीवर कर्ज मिळविण्यासाठी बॅंक ऑफ बडोदाच्या अनंतनगर शाखेत अर्ज केला. यावेळी त्याने आपल्या कृषक जमिनीला अकृषक दाखवली. त्यासाठी बनावट अकृषक जमिनीचा दाखला सादर केला. त्यामुळे जमिनीचे बाजारमूल्य अडीच कोटी रुपयांनी वाढून साडेपाच कोटी रुपये इतके झाले. महेश भटेजा याने कर्ज परत करण्यासाठी हमीपत्र सादर केले. इतर आरोपींना ती जमीन कृषक असल्याची माहिती होती. त्यानंतर बॅंकेचा विधी अधिकारी विजय पेटकर याने जमिनीचा तपासणी अहवाल बनावट सादर केला. आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने 2013 मध्ये संजयच्या नावाने 3 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. काही दिवस आरोपींनी कर्जाचे हप्ते भरले व त्यानंतर हप्ते भरणे बंद केले. दरम्यान, बॅंकेचे नवीन व्यवस्थापक राजू पुरुषोत्तम अमरू (50) रा. सेमिनरी हिल्स यांना वार्षिक अंकेक्षणादरम्यान या कर्जासंदर्भात शंका आली. त्यांनी पूर्ण दस्तावेज नव्याने तपासले असता जमिनीचा अकृषक दाखला बनावट असल्याचे समजले. यात तत्कालीन बॅंक अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे समजताच त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी तपास करून आरोपींविरुद्ध गिट्टीखदान पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT