BDO Satish Deshmukh
BDO Satish Deshmukh Sakal
विदर्भ

Shegaon News : लोकसभा निवडणूक अनुषंगाने बदली होऊनही बिडीओ देशमुख शेगावातच

सकाळ वृत्तसेवा

शेगाव - येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. व्ही. देशमुख यांची वरुड जिल्हा अमरावती येथे 23 फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाने लोकसभा निवडणूक अनुषंगाने केलेल्या बदल्यांच्या यादीमध्ये नाव आहे. त्यांच्या बदलीला आता तब्बल एक महिना कालावधी उलटला. मात्र जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना अद्याप कार्यमुक्त का केले नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे बीडिओ सतीश देशमुख हे शेगाव येथे एसबीआय कॉलनी मध्ये स्वतःचे घरामध्ये राहतात. बुलढाणा लोकसभा मतदारसंघांमध्ये खामगाव तालुक्यात कुंभेफळ हे त्यांचे मूळ गाव आहे. असे असतानाही त्यांना होम डिस्ट्रिक्टमध्ये काय ठेवण्यात आले. याबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त करण्यात येत असून, वरिष्ठ पातळीवर काहीतरी शिजले असावे अशी चर्चा पंचायत समिती कर्मचाऱ्यांमध्ये आणि ग्रामीण भागातील त्रस्त नागरिकांमध्ये आहे.

एस. व्ही. देशमुख यांच्या त्रासदायक कार्यशैलीला बरेच कर्मचारी कंटाळले आहेत. खाजगीमध्ये बोलताना या गटविकास अधिकाऱ्याची बदली होऊनही ते शेगावतच तळ ठोकून का आहेत याबाबत अनेक तर्कवितर्क ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक पंचायत समिती कर्मचारी लावत आहेत.

यासंदर्भात गटविकास अधिकारी सतीश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बदली झाली आहे, मात्र लोकसभा निवडणूक अनुषंगाने ग्रामविकास विभाग बदल्या करत नसते. तरी सुद्धा बदली करण्यात आली, मला दीड वर्ष झाले आहे. त्यामुळे मी नुकतेच काही दिवसांपूर्वी मॅटमध्ये प्रकरण दाखल केले आहे. मी दोन दिवस आजारी रजेवर आहे असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

OYO IPO: लवकरच येणार ओयोचा आयपीओ; सेबीकडे पुन्हा कागदपत्र जमा करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT