विदर्भ

महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला

सकाळवृत्तसेवा

बार्शी टाकळी (अकोला) : येथील श्री खोलेश्वर महाराज संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती. मात्र, अचानक मंदिराजवळ असलेल्या झाडावरील मधमाश्यांनी भाविकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात बालकांसह महिला-पुरुष असे ५० ते ६० भाविक जखमी झाल्याचा प्रकार सोमवारी (ता.४) दुपारी घडला. जखमी झालेल्या भाविकांमध्ये दोघांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.


शहरातील श्री खोलेश्वर संस्थानामध्ये महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी येथे भाविकांची गर्दी उसळते. यंदा सुद्धा भाविकांची गर्दी उसळली होती. मात्र, अचानक भाविकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये भविकांची एकच धावपळ झाली होती. या हल्ल्यात जवळपास ५० ते ६० भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमीमध्ये संजय बळीराम इंगळे, आदीत्य देविदास वाट, ओम संतोष इंगळे, आदित्य विनायक टेकाडे, दिलीप श्रीराम मोहकार, सुभाष सिंग बिसेनसिगं बेम, सुरेश बळीराम इंगळे, वैभव दिनकर माळवे, सुमन पांडूरंग करपे, सुमित विजय सिंग ठाकूर, विकास गजानन ठाकरे व लक्ष्मण या रुग्णांना बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमीक उपचार करून पुढील उपचार करिता अकोला सर्वोपचार मध्ये हलविण्यात आले. तर किरकोळ जखमी झालेल्या काही रुग्णांवर उपचार करण्यात आले, मात्र दुपार पर्यंत मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या वाढतच असल्याने दर्शनाकरिता येत असलेल्यांना गावातील नागरिकांनी सुचित केल्याने भाविकांनी मंदिरावर येणे टाळले. यामध्ये बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. महेश राठोड, डॉ. श्याम राठोड तसेच राहुल गवई व प्रशिक्षणार्थी डॉक्टारांनी प्राथमिक उपचार केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : रसिखच्या एकाच षटकात दोन विकेट्स; हार्दिकचं अर्धशतकही हुकलं, मुंबईचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

SCROLL FOR NEXT