korpana
korpana 
विदर्भ

Bharat Bandh : कोरपणा तालुक्यात काँग्रेसकडून चक्काजाम

सकाळवृत्तसेवा

कोरपणा (चंद्रपुर) : खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या तीन वर्षांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत जवळपास दुपटीने दरवाढ झाली आहे. सरकार जनतेची दिशाभूल करीत आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या आवासून उभ्या झाल्याचे व त्या सोडविण्यात लोक प्रतिनिधी, मंत्री सपशेल अपयशी ठरल्याने क्षेत्राची विकासगती मंदावली आहे तर नोटाबंदी जीएसटी यामुळे जीडीपी खालावून आर्थिक मंदी आणि महागाईचे चटके सर्वांना सोसावे लागत आहे. कागदी विकास उभा केला जातोय पण राज्यात आज लोडशेडिंगचे सौभाग्य लाभले आहे आणि सरकारी आशिर्वादाने शेतकऱ्यांवर विष फवारणी होत आहे.

प्रकल्प ग्रस्तांची होरपळ होत आहे. सर्व सामान्यांची फसवणूक होत असल्याचे मत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले. सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात राजुरा विधानसभा काँग्रेस आणि कोरपणा तालुका कमिटीतर्फे आज (ता. 10) कोरपणा बंद करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसचे कोरपणा तालुक्यातील आलेले अनेक महत्त्वपूर्ण नेते तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी कोरपणा कृषी बाजार समीतीचे सभापती श्रीधरपाटील गोडे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती स.ब.संचालक विजयराव बावणे माजी जिल्हा  परिषद सदस्य उत्तमजी पेचे श्यामभाऊ रणदिवे संभा कोवे सीताराम कोडापे घनश्याम नांदेकर सुरेश मालेकर तसेच कार्यकर्ते व.आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीच्या सभापती व सर्व सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य कोरपणा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, यासह कोरपणा तालुका काँग्रेस कमिटी, राजुरा विधानसभा काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, किसान सेल, अल्पसंख्यक विभाग, अनु जाती अनु जमाती विभाग, एनएसयूआय अशा काँग्रेसच्या सर्व विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, शेतकरी, शेतमजूर, युवक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT