File photo
File photo 
विदर्भ

पूरग्रस्तांसाठी शहर भाजप देणार दीड कोटी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील अनेक भागात पुराने गावे उद्‌ध्वस्त झाली असून, येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी शहर भाजप सहाही मतदारसंघात 18 ते 25 ऑगस्टदरम्यान मदतनिधीसाठी रॅली काढणार असल्याचे शहर भाजप अध्यक्ष प्रवीण दटके यांनी सांगितले. प्रत्येक नगरसेवक त्यांच्या प्रभागातही मदतनिधीसाठी फिरणार असून, नागरिकांनी कपडे, भांडी, औषधींसह पैशाच्या स्वरूपात मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदतनिधी देण्याकरिता गणेशपेठ व धंतोली येथील भाजप कार्यालयात नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन केले. यावेळी शहरातील सर्वच आमदारांनी प्रत्येक दोन लाख रुपयांचा धनादेश दिला असून, प्रदेश उपाध्यक्ष आमदार सुधाकर देशमुख यांच्या स्वाधीन करण्यात आला. शहरातून 1 कोटी 51 लाख रुपयांचा मदतनिधी गोळा करण्याचे लक्ष्य आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाच लाख रुपये, माजी खासदार अजय संचेती यांनी चार लाख 51 हजार खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दोन लाख 51 हजार रुपयांचा धनादेश दिल्याचे दटके यांनी सांगितले. महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विकी कुकरेजा, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनीही प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. याशिवाय महापालिकेतील सर्व 111 नगरसेवक त्यांचे एका महिन्याचे मानधन देणार आहेत. ते त्यांच्या प्रभागातही रॅली काढून नागरिक जी मदत देईल, ते गोळा करतील, असेही दटके यांनी नमूद केले. पत्रकारपरिषदेत प्रदेश भाजप उपाध्यक्ष आमदार सुधाकर देशमुख, प्रदेश प्रवक्‍ते आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार मोहन मते, संदीप जाधव, बंडू राऊत, किशोर पलांदूरकर, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT