dead body
dead body 
विदर्भ

नागपूर : बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू 

अनिल कांबळे

नागपूर : जुन्या मोडकळीस आलेल्या पानठेल्यावर अडकलेली चप्पल काढण्याच्या प्रयत्न करणाऱ्या 12 वर्षीय मुलाच्या अंगावर पानठेला कोसळला. यामध्ये गंभीर जखमी होऊन मुलाचा जागीच मृत्यू झाला. अमन आनंद लांडगे (रा. खापरी पुनर्वसन) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन लांडगे, वंश रॉय आणि बंटी हे तिघे आज मंगळवारी खापरी येथील एका मैदानावर खेळत होते. वंशने फेकलेली चप्पल मैदानाच्या बाजुला असलेल्या बंद अवस्थेत आणि मोडकळीस आलेल्या पानठेल्याच्या छतावर पडली. ती चप्पल काढण्यासाठी अमन, वंश आणि बंटी तिघेही प्रयत्न करीत होते. दरम्यान अमन पानठेल्यात घुसला तर त्याला वंश मदत करीत होता. चप्पल खाली पाडण्यासाठी त्यांनी काठीने प्रयत्न केला. चप्पल पडत नसल्याचे पाहून त्यांनी पानठेला हलविण्यास सुरूवात केली. पानठेल्याची लाकडे सडलेली असल्यामुळे तो ढाचा अमनच्या अंगावर पडला. ढाच्याखाली अमन बदला गेला. त्याच्या छातीवर मोठे लाकूड पडल्याने तो बेशुद्ध पडला. तर वंशचाही पाय अडकल्याने त्यालाही जबर दुखापत झाली. पानठेला पडल्याचे पाहून आजुबाजूच्या नागरिकांनी तिकडे धाव घेतली.

दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी अमनला तपासून मृत घोषित केले तर वंशवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त केल्या जात आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

एकुलता एक होता अमन 
अमनचे वडील हातठेल्यावर घरोघरी जाऊन भाजी विक्रीच्या व्यवसाय करतात. तर आई हिंगण्यातील एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हाऊसकिपींचे काम करते. त्यांना मोठी मुलगी असून ती सध्या बी.एस्सी द्वितीय वर्षाला आहे तर अमन हा सातव्या वर्गाचा विद्यार्थी होता. अभ्यासात हुशार असलेला अमन परिसरात "चुलबूल' नावाने प्रसिद्ध होता. एकुलता एक मुलगा गेल्याचे वार्ता कळताच आई आणि वडीलांनी लगेच घरी धाव घेतली. अमनचा मृतदेह पाहताच आईने मोठ्याने हंबरडा फोडला. 

चप्पलने घेतला बळी 
एकमेकांना चप्पल मारण्याचा खेळ अमन आणि दोन्ही मित्र खेळत होते. वंशने अमनची चप्पल पानठेल्यावर फेकली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. दोघांनीही चप्पल काढण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, यश न आल्यामुळे वंशने अमनला पानठेल्यात घुसण्याचा सल्ला दिला. पानठेला जोरात हलविल्यामुळे लाकूड अमनच्या छातीवर पडून मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT