A boyfriend raped girlfriend at Nagpur
A boyfriend raped girlfriend at Nagpur 
विदर्भ

नागपूर : प्रियकराने केला प्रेयसीवर बलात्कार

सकाळवृत्तसेवा

नागपूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाने प्रेयसीवर घरात एकटी असल्याची संधी साधून बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. मिथून कैलास उईके (वय 31, रा. कंट्रोल वाडी) असे आरोपीचे नाव आहे. 

पीडित 21 वर्षीय युवती स्नेहा (बदललेले नाव) ही एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये नोकरीवर होती. तर आरोपी मिथून एका खासगी कंपनीत नोकरी होता. दोघेही मूळच कुही तालुक्‍यातील खेडेगावचे असून दोघांचेही कौटूंबिक संबंध असल्यामुळे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. दोघांची एकमेकांशी ओळख झाली. नोकरीवर असलेल्या स्नेहाशी मिथूनने जवळिक वाढवली. तिचा पाठलाग करणे किंवा तिच्या घरी विनाकारण भेटायला जाणे, असे प्रकार मिथून करीत होता. मैत्री वाढवत त्याने स्नेहावर प्रेमाचे जाळे टाकले. जाळ्यात अकडल्यानंतर तिला तो फिरवायला, चित्रपट बघायला नेत होता. 16 जून 2018 ला मिथून हा गिट्टीखदानमध्ये राहणाऱ्या स्नेहाच्या घरी आला. घरात कुणी नसल्याची संधी साधून त्याने स्नेहाला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने तिच्यावर बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. 

वारंवार लैंगिक शोषण :
मिथून वारंवार स्नेहाच्या घरी यायला लागला. लग्न करण्याचे आमिष दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिचे जवळपास 10 महिने लैंगिक शोषण केले. तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले. फार्म हाऊस आणि अन्य शहरात नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार स्नेहाने केली आहे. 

बहिणीचे जुळले लग्न :
स्नेहाने कुटूंबियांनाही मिथूनने दिलेल्या लग्नाच्या आमिषाची माहिती दिली. त्याला कुटूंबियांनी लग्नाची गळ घातली. त्याने बहिणीचे लग्न जुळल्यानंतर लग्नाची तारीख ठरविण्याचे सांगितले. मात्र, आता बहिणीचे लग्न जुळल्यानंतर मिथून लग्नास नकार देत असल्यामुळे स्नेहाने पोलिस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार नोंदविली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT