बैलाविना फावड्याला पास लावून डवरणीचा शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग 
विदर्भ

बैलाविना फावड्याला पास लावून डवरणीचा शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

विरेंद्रसिंग राजपूत

नांदुरा (बुलढाणा) : मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील सखाराम गोविंदा हिंगे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील सोयाबीन या पिकात बैलविना डवरणीचा अनोखा प्रयोग करून इतरांसाठीही आदर्श निर्माण केला आहे.

सखाराम हिंगे यांचेकडे कोरडवाहू शेती असून, सध्या शेतीमशागतीच्या कामांना वेग आला आहे. अशातच इतरांना बैल मागावे तर बैल मिळत नाही. याकरिता त्यांनी अफलातून शक्कल लढवून घरी असलेल्या टाकाऊ फावड्याला कापून त्याला खाली पास बसेल असे बनवून चक्क हाताने स्वतः ओढले जाईल असे बनविले. कुणाचाही आधार न घेता डवरणी करण्याचा प्रयत्न केला व त्यात ते यशस्वीही ठरलेत. यामधून होईल तेवढे काम यातून मार्गी लागत असून, सोयाबीन पीक तण विरहित होत आहे, असे ते सांगतात. दिवसभर निंधन करूनही जेवढे काम होत नाही ते यातून होत आहे. बैल नसतानाही स्वतः मेहनत करून वेगळे काही तरी करण्याची मानसिकता असली की मार्ग सापडतोच हेच यातून दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi News: विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राजकारण तापलं! राहुल गांधींनी सरकारला घेरलं; ठेवल्या तीन ठोस मागण्या, पण कोणत्या?

New Cricket Rules: मुद्दाम नो-बॉल टाकला, तर बॉलर मॅचमधून बाहेर! BCCI लागू करणार असलेल्या नव्या नियमांबद्दल घ्या जाणून

शरद पवार पंतप्रधान मोदींना का भेटले? अखेर कारण आलं समोर; दोन पानी पत्रात नेमकं काय लिहिलंय?

Japanese Eating Habit: २० टक्के पोट रिकामे ठेवून दीर्घायुष्य? काय आहे जपानची 'हारा हाची बू' पद्धत ?

Donald Trump Tariff: ट्रम्प यांचा नवा ‘टॅरिफ बॉम्ब’! जेनेरिक औषधांवर २०० टक्के टॅरिफ; भारतावर मोठा परिणाम?

SCROLL FOR NEXT