विदर्भ

हवेतून केबलवर बसही धावणार - नितीन गडकरी

सकाळवृत्तसेवा

नागपूर - रेल्वेच्या विस्तारात ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे क्रांतीकारी पाऊल असून, नागपुरातील या प्रकल्पामुळे भारताच्या इतिहासात नवा अध्याय जोडला जात असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी हवेतून बस, अर्थात केबलवर चालणाऱ्या बसविषयी 15 ऑगस्टनंतर निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. 

रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात महामेट्रोचे सुनील माथूर, रेल्वेचे डीआरएम सुमेशकुमार, विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पासंबंधाने करारावर स्वाक्षरी केली. या समारंभात केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ब्रॉडगेज मेट्रोने वर्धा-नागपूर अंतर 35 मिनिटांत तर रामटेक-नागपूर अंतर 20 मिनिटांत पूर्ण करता येईल. वर्धा-नागपूर प्रवासाचा बस तिकिटाचा दर 90 रुपये असून ब्रॉडगेज मेट्रोमुळे नागरिकांना 60 रुपयांत एसीचा प्रवास शक्‍य होणार असून मोठा दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले. नागपूरप्रमाणेच भोपाल, इंदूर येथेही ब्रॉडगेज मेट्रो सुरू करावी, अशी सूचना त्यांनी उपस्थित असलेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना केली. केबलने विजेवरील बसप्रमाणे ट्रकही चालविता येईल, त्यामुळे प्रदूषणात घट होईल. सांडपाण्यातून मिथेन तयार होते, यातून वाहने चालविणे शक्‍य आहे. परंतु सरकारी यंत्रणेची समजूत काढणे, त्यातही महापालिकेच्या अधिकाऱ्यांची समजूत काढणे दिव्य काम असल्याचे नमूद करीत त्यांनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. वेकोलितून कोळशासोबत वाळूही बाहेर निघते, ही वाळू कमी दराने उपलब्ध करून दिल्यास गरिबांसाठी तयार होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसह रस्त्यांच्या कामातही वापरता येईल, असा सल्ला त्यांनी कोळसामंत्री गोयल यांना दिला. 

नागपूरकडे बघताना इर्षा होते - केंद्रीय मंत्री गोयल
नागपूर देशासाठी मॉडेल ठरतेय. ब्रॉडगेज मेट्रो गडकरींच्याच संकल्पनेतून पुढे आली असून नागपूरकडे बघताना ईर्ष्या होते, अशा शब्दांत केंद्रीय रेल्वे व कोळसामंत्री पीयूष गोयल यांनी शहराच्या विकासाची प्रशंसा केली. विजेवरील वाहतुकीबाबत नागपूर देशासाठी प्रेरक ठरत असून रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी 67 हजार कोटींच्या योजना असून महामार्गाशी रेल्वे जोडण्याचा प्रकल्पही समृद्धी मार्गातून सुरू व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. गडकरी यांच्या सूचनेला होकार दर्शवित त्यांनी कोळसा खाणीतील वाळू अल्प दराने वेकोलि उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT