बुटीबोरी - येथील हल्लाबोल सभेला संबोधित करताना खासदार सुप्रिया सुळे.
बुटीबोरी - येथील हल्लाबोल सभेला संबोधित करताना खासदार सुप्रिया सुळे. 
विदर्भ

खोट्या आश्‍वासनांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या - सुप्रिया सुळे

सकाळवृत्तसेवा

बुटीबोरी - सरकारविरोधात निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ पदयात्रेचा शेवट विधानभवनावर होणार आहे. त्यानिमित्ताने आम्ही ३४९ किलोमीटरचा प्रवास केला. सरकारच्या कामगिरीवरून विदर्भात काय हाल आहे, शेतकरी कसे जीवन जगत आहेत, त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने झाला. दुष्काळ, अवकाळी पाऊस हे निसर्गचक्र आहे. परंतु, इथल्या महिलांचे कपाळ पाहून धक्काच बसतो, हा इतका गंभीर प्रकार असताना मुख्यमंत्री महोदयांना झोप कशी लागते, हेच कळत नाही. सरकारने नुसत्या खोट्या आश्‍वासनांच्या बळावर शेतकऱ्यांना  आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची स्थिती खासदार सुप्रिया सुळे यांनी बुटीबोरी ‘हल्लाबोल’ सभेत उपस्थित केली.

शनिवारी (ता.९) दुपारी ५वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘हल्लाबोल’ पदयात्राचे स्वागत वर्धा मार्गावरील एसीसी चौक येथे करण्यात आले. त्यानंतर एसीसी चौकामधून बुटीबोरीपर्यंत  निघालेल्या पदयात्रेचे बोरी चौकात सायंकाळी ७ वाजता सभेत रूपांतर झाले. यावेळी खूप गर्दी झाली होती. मंचावर जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री भास्कर जाधव, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, आमदार विद्या चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, सुरेखा ठाकरे, माजी मंत्री गुलाबराव गांवडे आदी उपस्थित होते.पंतप्रधान मोदी तरी जनतेपर्यंत ‘अच्छे दिन’ लवकरच आणणार, अशी आशा होती. परंतु,  अचानक नोटाबंदी व जीएसटीच्या परिणामांमुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. कामगारांना काम नाही. बेरोजगारीवर लक्ष नही. जीएसटीच्या निर्णयामुळे ४५ लाख बेरोजगार झाले, असल्याची टिका माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. त्याचबरोबर जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च, तोच खर्च शेतकऱ्यांवर केला असता तर आत्महत्या घडल्या नसत्या.

त्याचबरोबर मोदींनी दिलेल्या आश्‍वासनांची स्क्रिनवर माहिती दिली. ही दिलेली आश्‍वासने खोटी ठरली म्हणून जनता टाळया वाजवित होती. शेतकरी, शेतमजूर यांचे भले करण्यासाठी या सरकारला पायउतार  करण्याची वेळ आल्याचे व्यक्तव्य जयंत पाटील यांनी केले.

वाहतूक विस्कळीत
हल्लाबोल पदयात्रा बुटीबोरी चौकात पोहोचताच दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची रेलचेल वाढत होती. पहिलेच बोरी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. चौकाच्या बाजूलाच हा कार्यक्रम असल्याने सभा होईपर्यंत तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तरी हल्लाबोल पदयात्रा सुरळीत पार पाडण्याकरिता पोलिस तैनात असल्याने पोलिसांनी जिवाचे रान करून वाहतूक सुरळीत केली. या सभेतील नेत्यांचे स्वागत सुरू होते आणि दुसरीकडे वाहतुकीच्या त्रासाची चर्चा सुरू होती.

सर्वसामान्यांशी नाळ जोडणारा पक्ष निर्माण करू
फक्त  ब्ल्यूप्रिंट तयार करणारा नव्हे, तर सर्वसामान्यांना न्याय देणारा, विश्वास देणारा आणि जनतेशी नाळ जोडणारा अशी राष्ट्रवादी पक्षाची रजना केली जाईल, असे आश्‍वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. 

यवतमाळ जिल्ह्यातून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आज नागपूरच्या खापरी गावात दाखल झाली. यावेळी त्या बोलत होत्या. बुलेट ट्रेन, मोनो रेल यासारखे मोठमोठे विकास होत राहणार आहेत. हा विकास तसा गौण आहे; परंतु आपल्याला सर्वसामान्य लोकांना विकासाची दिशा देऊ या, असे सूचित केले. आपली सत्ता येईल तेव्हा बघू. परंतु, आपल्याला, आपल्या पक्षाला फार मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी पक्ष आणखी मजबूत असणे आवश्‍यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

सभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, पक्षनेते धनंजय मुंडे, नवाब मलिक, फौजिया खान, अनिल देशमुख, गुलाबराव देवकर, भास्कर जाधव, राजेंद्र शिंगणे, चित्रा वाघ, हेमंत टकले, राणा जगदिशसिंह, विद्या चव्हाण, ख्वाजा बेग, शशिकांत शिंदे, भाऊसाहेब चिकटगावकर, जयदेव गायकवाड, सतीश चव्हाण, प्रकाश गजभिये, जयवंत जाधव, किरण पावसकर, सतीश पाटील, नरहरी झिरवळ,  संदीप बजोरिया, रमेश बंग, गुलाबराव गावंडे, सुरेश देशमुख, सलील देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT