crime
crime 
विदर्भ

मारहाण प्रकरणी परिणय फुके, नाना पटोलेंवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

साकोली (जि. भंडारा) : रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या प्रचारादरम्यान वादातून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार डॉ. परिणय फुके व काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्यासह कार्यकर्ते  यांच्यावर साकोली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.  

शुक्रवारी (ता. १८) रात्री ९ वाजताच्या सुमारास काँग्रेस उमेदवार पटोले यांचा पुतण्या तीर्थानंद विनोद पटोले हा लहान भावासोबत चारचाकी वाहनाने सुकळी येथे जात होता. दरम्यान, लाखांदूर रस्त्यावर एका वाहनाशेजारी गर्दी दिसून आली. तेथे जावून पाहणी केली असता, वाहनातील भाजपचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना विचारणा केली असता, त्यांनी पटोले भावडांना काठी व बुक्यांनी मारहाण केली. परंतु, दोन्ही भावांनी दीपक लोहिया या व्यक्तीला पैशाच्या बॅगसह वाहनात बसवून कारवाई करिता साकोली पोलिस ठाण्यात आणले. त्याला बॅगसह पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिस ठाण्यासमोर फोनवर बोलत असताना डॉ. परिणय फुके व त्यांचे अंदाज ३० कार्यकत्र्यांनी तीर्थानंद पटोले यास ओढत जुन्या तहसील कार्यालयाकडे नेले. तेथे त्याला मारहाण केली. या तक्रारीवरून दीपक लोहिया, भाजप उमेदवार डॉ. परिणय फुके व इतर ३० कार्यकत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जप्त केलेल्या बॅगमधून १७ लाख ७४ हजार ६०० रुपये नगदी मिळून आले. 

तर, नितीन नीलकंठ फुके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चुलत भाऊ डॉ. परिणय फुके यांच्या प्रचाराकरिता साकोली मुक्कामी असताना रात्री साडेअकरा वाजता हॉटेलकडे पायी जात होतो. यावेळी स्कॉपिओ गाडीतून आलेले नाना पटोले, रिंकी पटोले व ३० ते ४० जणांनी शस्त्राचा धाक दाखवून आपल्या गाडीत बसवून प्रचार कार्यालयात नेवून मारहाण केली. दोघांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी परिणय फुके व नाना पटोले यांच्या समर्थकांवर गुन्हे नोंदविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT