chandrapur murder
chandrapur murder 
विदर्भ

घरगुती वादातून वडिलांचे डोके झाले गरम अन मुलांवरच झाडल्या गोळ्या, नंतर...

सकाळवृत्तसेवा

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : कोरोनामुळे टाळेबंदीत शांतता असताना शहराला हादरवून टाकणारी घटना मंगळवारी (ता. 28) येथे घडली. वडिलांनी स्वत:च्या दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत:लाच गोळी मारून आत्महत्या केली. ही घटना येथील भगतसिंग वॉर्डात सायंकाळी पाच वाजताच्या सुमाराला घडली. यात एका मुलाचा मृत्यू झाला. दुसरा गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. कुटुंबातील आपसी वादातून हे हत्याकांड घडल्याचा अंदाज आहे.

शहरातील भगतसिंग वॉर्डात राहणारे मुलचंद द्विवेदी (वय 50) यांनी त्यांचा मुलगा आकाश द्विवेदी (वय 22) आणि पवन द्विवेदी (वय 20) यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत वडील मुलंचंद द्विवेदी यांनी आधी आकाशच्या छातीत गोळ्या झाडल्या. तो जागीच ठार झाला. शेजारीच उभ्या असलेल्या पवनवरही बेछूट गोळीबार केला. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पवन गंभीररित्या जखमी आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.

एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
या गोळीबाराचा आवाज ऐकून द्विवेदी कुटुबांतील मुलचंद यांचा पुतण्या कुलपदी द्विवेदी याने घराकडे धाव घेतली. त्यावेळी गोळीबार सुरूच होता. कुलदीपच्या अगदी जवळून एक गोळी गेली. त्यात तो थोडक्‍यात बचावला. हल्लेखोर मुलचंद द्विवेदी भाजपचे बल्लारपूर अध्यक्ष आणि पालिकेचे विद्यमान स्वीकृत सदस्य शिवाचंद द्विवेदी यांचा भाऊ आहे. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी भगतसिंग वॉर्डाकडे धाव घेतली. पोलिसही घटनास्थळी पोहोचले. वृत्त लिहीस्तोवर पंचनामा सुरू होता. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र कौटुंबिक वादातून हत्याकांड घडले असावे, अशी चर्चा आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT