file photo
file photo 
विदर्भ

चिकनचे दर वाढले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोबड्यांच्या कमी उत्पादनामुळे चिकनचे भाव वाढलेले आहेत. असे असले तरी त्याचा फायदा शेतकरी अथवा पोल्ट्री संचालकांना मिळत नसून व्यापारीच मलिदा लाटत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी अथवा पोल्ट्री संचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
पावसाळ्याच्या तोंडावर चिकनचे भाव वाढल्याने खवय्यांनीही त्याकडे पाठ फिरवली आहे. भरउन्हाळ्यात कोंबडीचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून पडलेल्या दरात कोंबड्यांची खरेदी केली जात आहे. खाद्याचे दर वाढलेले असताना व्यापारी कमी दरात कोंबड्यांची खरेदी करीत आहेत. मात्र, किरकोळ बाजारात प्रतिकिलो 110 ते 115 रुपये विकल्या जाणाऱ्या कोंबड्यांना घाऊक बाजारात फक्त 80 ते 85 रुपये प्रतिकिलो दर मिळतो आहे. उत्पादन खर्च आणि घाऊक दर यांच्यात ताळमेळ जुळत नसल्याने अनेक शेतकरी आणि पोल्ट्री संचालक हवालदिल झालेले आहेत. कोंबड्यांचे पालन पोषण करणे, निगा राखण्यापेक्षाही अतिशय अल्प किंमत पोल्ट्री संचालकांना मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला उतरती कळा आली आहे. पूर्वी हैदराबाद, पुण्यापेक्षा नागपुरातील कोंबड्यांचे दर अधिक राहत होते. गेल्या दोन महिन्यांपासून ती स्थिती उलटी झालेली आहे.
साधारणपणे हिवाळ्यात मांसाहाराला चांगली मागणी असते. त्यामुळे दरदेखील चढे असतात. मात्र, यंदा उन्हाळ्यात उत्पादन कमी असल्याने चिकनचे भाव वधारले आहेत. त्याचा फायदा व्यापारी उचलत आहेत. वाढलेले भाव हे जून महिन्याच्या अखेरपर्यंत राहण्याची शक्‍यता आहे. व्यापाऱ्यांची साखळीच या प्रकाराला जबाबदार असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT